मागील 50 वर्षात राहिलेला विकासाच बॅकलाॕक येत्या अडीच वर्षात शंभर टक्के भरुन काढू- आ समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

मागील 50 वर्षात राहिलेला विकासाच बॅकलाॕक येत्या अडीच वर्षात शंभर टक्के भरुन काढू- आ समाधान आवताडे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील कोणतेही प्रलंबित काम असो दया आता केंद्रात व राज्यात आपलेच सरकार असल्याने मागील 50 वर्षात राहिलेला विकासाच बॅकलाॕक येत्या अडीच वर्षात शंभर टक्के भरुन काढू असा विश्‍वास आ समाधान आवताडे यांनी मारुती पटागणांतील जाहीर नागरी सत्कार सभेत बोलताना दिला.

           


  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशात लक्षवेधीव्दारे उपस्थित केलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रश्‍नाला जलसंपदामंत्री देवेद्र फडणवीसाकडून हिरवा कंदील मिळविल्याबददल आ समाधान आवताडे हे आज मतदारसंघात परतले मंगळवेढा व पंढरपूर ताल्ाुक्याच्या सिमेवरुन त्यांचे मोटरसायकल रॅली काढून स्वागत करुन मारुती पटागणांत 24 गावाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर  भाजपाचे जिल्हा संघटन चिटणीस शशिकांत चव्हाण,माजी सभापती प्रदीप खांडेकर, विष्णूपंत आवताडे,सोमनाथ आवताडे, अॕड.बापू मेटकरी, चंद्रकांत पडवळे,विवेक खिलारे,सुरेश भाकरे,भारत निकम, धनाजी गडदे,शिवाजी पटाप,विजय बुरकुल,महादेव जाधव,आदीत्य हिंदुस्थानी,आदीसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आ आवताडे म्हणाले की,माझ्या आमदारकीच्या काळातील आठ महिने कोरोनात गेली,महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रत्येक अधिवेशनात विचारतोय मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची फाईल कुठाय असा प्रश्‍न केला.सरकार बदलताच या योजनेचा प्रश्‍न सात दिवसात मार्गी लावण्याचा शब्द उपमुख्यमंत्रानी दिले रस्तेसाठी निधी मिळविला शिवाय आंधळगाव व 10 गावाच्या योजनेसाठी 10 कोटीचा निधी मिळवला.पौट साठवण तलावाची प्रशासकीय मान्यता पुर्नजीवीत करण्यासाठी प्रयत्न करताना 7 कोटीचा तलाव आता 100 कोटीच्या आसपास गेली आहे त्यामध्ये बाधीत शेतकय्रांना भरपाई देखील मिळणार आहे 40 गावाच्या भोसे पाणीपुरवठा योजनेतील थकीब वीजबिल माफीची मागणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली मागणं उणधुण काढण्यापेक्षा यापुढील बंद योजना सुरु कशा राहतील वर भर देणार आहे.ते प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे यावेळी शशीकांत चव्हाण म्हणाले उजनीसाठी सर्वाधिक प्रकल्पग्रस्त मंगळवेढयातील असताना उजनी व म्हैसाळ योजनेच्या शेवटी मंगळवेढा तालुका येत असल्याने पाण्यासाठी संघर्ष करावा लागला,प्रास्ताविक अशोक केदार यांनी केले सुत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले.

-----------

मंगळवेढयाच्या पाणीप्रश्‍नासाठी झटलेल्या माजी आमदारासह दिवंगत झालेल्या स्व आ भारत भालके,जयसिंग निकम,बाबासाहेब बेलदार यांच्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले.त्यांचे योगदानही विसरता येणार नसल्याचे आ आवताडे म्हणाले. एकंदरीत दामाजी निवडणुकीनंतर आ.आवताडे यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करून कार्यकर्त्यांना चार्ज केले

test banner