देशाचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा " डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड - 2022 " हा शैक्षणिक कार्य पुरस्कार मंगळवेढा नगरीचे सुपुत्र मा. प्रा. डॉ. मंगेश मोहन वेदपाठक सर यांना जाहीर झाला आहे. मा. डॉ. वेदपाठक सरांच्या या अभूतपूर्व यशप्राप्तीबद्दल लोकप्रिय आमदार मा. समाधान दादा आवताडे यांनी पुरस्कारार्थी यांचा आमदार दालनामध्ये जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय बापूंच्या उपस्थितीमध्ये शाल, फेटा व पुष्पहार घालून अभिनंदन सत्कार केला.
जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक ज्ञानसेवा या त्रिसूत्री कार्य साधनेच्या माध्यमातून मा. वेदपाठक सर यांनी सारस्वत विद्या प्रांगणात या पुरस्काराला गवसणी घालून मंगळवेढे करांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. रूळलेल्या अथवा मळलेल्या वाटेवरून चालणारे अनेक जण असतात पण आपल्या अंगीभूत गुणांच्या कौशल्य सिद्धीने स्वतःची वाट निर्माण करणारे अशा पुरस्कारांचे मानकरी ठरतात असा शब्दात आमदार मा. दादासाहेब यांनी पुरस्कारार्थी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती मा. सोमनाथ जी आवताडे, मा. रमेश काका टाकणे, माजी मिस्टर नगरसेवक मा. योगेश फुगारे मेंबर, उद्योजक मा. अभिजित लोखंडे उपस्थित होते.