मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी 50 कोटींचा निधी मंजूर- आ.समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी 50 कोटींचा निधी मंजूर- आ.समाधान आवताडे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारच्या पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार समाधान आवताडे यांनी मागणी केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटीचा निधी मंजूर झाला असून राज्यात मविआ सरकार कोसळल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला चांगले दिवस आले आहेत. गेल्या महिन्याभरात जवळपास ७५ कोटी रुपयांची विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.


आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील रस्ते अतिशय खराब झालेले असून रस्त्याच्या पृष्ठभागामध्ये मोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीची मोठी गैरसोय होत असल्याच्या अनुषंगाने रस्ते रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आमदार समाधान आवताडे यांच्या या मागणीला मोठे यश मिळाले सदर रस्त्यांसाठी एकूण ५० कोटी ५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मंगळवेढा तालुक्यातील रस्ते चकाचक होणार आहेत.


नवीन सरकार स्थापनेनंतर नव्या विकास विमुख शासनाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला भरघोस निधी पुरवणी मागण्याच्या मार्फत दिला आहे. यातील मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल आमदार साहेबानी समाधान व्यक्त केले..

परंतु पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नती नसल्यामुळे एक ही काम पंढरपूर तालुक्यातील घेता न आल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.

50-54 च्या शीर्षकाखाली जर रस्त्याची दर्जोन्नती झाली नसेल तर हे काम सदर शीर्षकाखाली घेता येत नाही या करताच रस्त्यांची दर्जोन्नती  होणे आवश्यक असते,पण मागील अनेक वर्षांपासून सदरचा दर्जोन्नतीचा  प्रस्ताव प्रलंबित आहे.याकरिता मी स्वतः उपमुख्यमंत्री यांना सदर रस्त्याची दरजोन्नती त्वरित होणेकरता विनंती केली आहे.... पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील नागरी सुविधांसाठी, ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांसाठी, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी सत्तांतरानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात आणला आहे.


आ समाधान आवताडे यांनी निधी तरतूद मागणी केलेल्या रस्त्यांची यादी पुढीलप्रमाणे -


पाटखळ - नंदेश्वर - भोसे - हुन्नूर ते राज्य हद्द रस्त्यांची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, मांजरी - लक्ष्मी दहिवडी - आंधळगाव -पाटखळ -भाळवणी - तळसंगी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख, महमदाबाद -लोणार - पडोळकरवाडी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ८० लाख, पाटखळ - नंदेश्वर -भोसे - रेवेवाडी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख, मंगळवेढा -डोंगरगाव - शिरनांदगी - हाजापूर रस्ता रस्ता सुधारणा करणे ५ कोटी, धर्मगाव -ढवळस - मल्लेवाडी - घरनिकी - मारापुर गुंजेगाव -लक्ष्मीदहिवडी -मेडशिंगी ते जवळा रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख,  मंगळवेढा -खोमनाळ - भाळवणी - निंबोणी - सलगर बु रस्ता सुधारणा करणे ३ कोटी, मंद्रूप - निंबर्गी - भंडारकवठे - कर्जाळ - हुलजंती - पौट - मरीआई चौक निंबोणी - नंदेश्वर -गोणेवाडी - लेंडवेचिंचाळे रस्ता सुधारणा करणे ९ कोटी, दिघंची जिल्हा सरहद्द खवासपुर - लवटेवाडी - सोनलवाडी - वाणीचिंचाळे - भोसे घेरडी -हुन्नूर - मारोळी - सलगर बु  ७ कोटी २५ लाख असा निधी मंजूर झाला आहे.


test banner