मंगळवेढा (प्रतिनिधी) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कर्जावरील आकड्यावरून आमच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले. याबाबतची सत्यता अहवालातून समोर येणार आहे मात्र आमचे सत्य त्यांचे असत्य खोडण्यात कमी पडल्याची खंत आ. समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक सुरेश भाकरे,भारत निकम,विनोद लटके, अविनाश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की पोटनिवडणुकीतनंतर आमदार झाल्यानंतर काही दिवस कोरोनाचा सामना करावा लागल्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात अडचणी आल्या मात्र सत्ता बदलामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गती घेतली असून दामाजी कारखान्याचा कारभार हातात घेतल्यानंतर 137 कोटीमुद्दल व त्यावरील व्याजासहित 145 कोटी रुपये देणे होते त्या अवस्थेत कारभार घेतला. कर्जा पेक्षा व्यास जास्त असल्यामुळे बहुतांश बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली मात्र संचालक मंडळाच्या नावे कर्ज घेऊन सहा वर्ष कारखाना चालवून दाखविला. कारखाना ताब्यात घेतल्यावर काहींनी एफ आर पी दिल्यावर दामाजी चौकात सत्कार करून असे आव्हान दिले तरी देखील एफआरपीप्रमाणे दर देऊन दाखवला कर्जातील आकडेवारीचा अहवाल येत्या दोन महिनाभरात समोर येईल चुकीची आकडेवारी मांडून सभासदांची दिशाभूल करू नये टेक्समो कंपनीच्या न्यायालयीन दाव्यासाठी 29 कोटींचा खर्च केला केला.आमच्या कार्यकाळात इतर प्रकल्प नसल्याने तालुक्यातील परिस्थिती, कोरोना आणि साखरेचे घसरलेले दर याचा सामना करावा लागला.सभासदाचा सवलतीत साखर निर्णय देखील सत्ताधाय्राकडून मागे घेण्याची शक्यता असून सहा वर्षात एकाचाही धनादेश बाऊन्स होऊ दिला नाही.नगरपालिकेच्या राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले की नगरपालिकेच्या राजकारणात करंगळी धरून हातात पालिकेत गेलेल्यांनी कारभाऱ्यालाच नगरपालिकडून बाहेर काढले असून त्यांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर जनता पालिका निवडणुकीत दाखवून देईल.नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्यांनी चांगले काम केल्यादबद्दल नगराध्यक्षाचे आता नाव घेतले गुन्हा न दाखल व्हावा म्हणून मी मध्यस्थी केले.नगर पालिका निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जाणार असून त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे. 16 तास काम करणारा मी लोकप्रतिनिधी असून प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये त्रुटी लागल्या असून त्यामध्ये गावातील क्षेत्र कमी गृहीत धरले आहे त्या गावात असणारे पाझर तलावाचा समावेश व क्षेत्र वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बसवेश्वर व चोखामेळा स्मारकासाठी आमदार झाल्यावर पहिलांदा प्रश्न उपस्थित केला.आता सत्ता बदलाने हा मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.राजकीय हव्यासापोटी अपत्य लपवणा-याची डी एन ए टेस्ट करण्याचे आव्हान दिले.