श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुक प्रचाराचा बॉयलर पेटला - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २० जून, २०२२

श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुक प्रचाराचा बॉयलर पेटलाप्रतिनिधि :  

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याची पंचवार्षिक निवडणूक अतिटतीची होऊ लागली आहे. विद्यमान चेअरमन श्री. भगीरथ भालके यांच्या पॅनल ला श्री. अभिजीत पाटील आणि संचालक श्री. युवराज पाटील यांनी स्वतंत्र पॅनल करून आव्हान उभे केले आहे.

दोन दादा आणि एक आबा अशी तिरंगी लढत होणार आहे. अजून उमेदवारी फायनल झाली नाही. पॅनलला  चिन्ह मिळायच्या आधीच सर्व संभाव्य उमेदवार आणि पॅनल प्रमुखानी प्रचाराचा बॉयलर जोरात पेटवला आहे. आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. कुणी बंद दारा आड झालेली चर्चा जाहीर करत आहे तर कुणी मागचा इतिहास सांगत आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होणार पण प्रचाराचा हा स्तर पातळी सोडून होवू नये हीच अपेक्षा जनतेतून होत आहे.

"सामान्य मतदार शेतकरी हा कारखाना चालू झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे या अपेक्षेने निवडणुकीकडे पाहत आहे. शेतकरी कारखान्याकडे फक्त आर्थिक नव्हे तर भावनिक होवून पाहत असतो."

आषाढी वारी नंतर होणारी ही निवडणूक जोरात रंगणार आहे हे नक्की.  

 

 

#vitthalsugar #election2022 #bhagirathbhalke #yuvarjpatil #abhijitpatil #pandharpur 

test banner