ओबीसी भटक्या विमुक्तांच्या महाजागर मेळाव्यात नरेंद्र पवार यांचा शासनाला इशारा
मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती
लातुर (प्रतिनिधी) जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत राज्यात निवडणूका होऊ देणार नाही असा इशारा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज शासनाला दिला.
ओबीसी व इतर मागासवर्गीय समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्यात पवार बोलत होते.
भाजपाने कायद्याने मिळविलेले आरक्षण राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रद्द झालं असून ओबीसी इतर मागासवर्गीय तसेच मराठा समाजावर राज्य सरकारने अन्याय केला असल्याची टीकाही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, मेळाव्याचे आयोजक व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, राज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. अतुल सावे, आमदार रमेश अप्पा कराड, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भटके विमुक्त प्रदेश सहसंयोजक देविदास राठोड, डॉ गुलाबराव सांगळे, ऍड भाग्यश्री ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते