श्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" ची स्थापना- सदाशिव जाधव - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

श्रीमंत हिरोजी इटळकर यांची प्रेरणा घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" ची स्थापना- सदाशिव जाधव

 "शिवक्रांती फौंडेशन" च्या कामाची सुरूवात महाड येथील पुरगृस्थांना मदत व सेवा करून!     

  पुणे(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला "शिवक्रांती फौंडेशन" च्या सदस्यांनी भेट दिली आणि रायगडचे शिल्पकार आणि स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा उल्लेख असलेल्या पायरीवर नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" स्थापना व समाजाहितोपयोगी कार्यास रायगड येथूनच शुभारंभ करण्यात आले. 


यावेळी "शिवक्रांती फौंडेशन"चे मार्गदर्शक पुण्याचे सदाशिव जाधव,शंकर माने,कँप्युटर क्षेत्रातील तज्ञ पुण्याचे महादेव धोत्रे,युवकांचे मार्गदर्शक नवनाथ धोत्रे महाराज, करकंब चे महेंद्र पवार,महेंद्र पेटकर, पत्रकार महादेव धोत्रे, टेंभुर्णीचे लालाजी धोत्रे,रोहिदास पवार, विकास माने ,वैभव धोत्रे, प्रशांत धोत्रे,व्यंकटेश देवकर इत्यादी उपस्थित होते.          यावेळी "शिवक्रांती फौंडेशन"चे मार्गदर्शक पुण्याचे सदाशिव जाधव म्हणाले "या आधी वडार समाजासाठी कोणी काय केले याविषयी चर्चा करण्यापेक्षा इथून पुढे शिवक्रांती फौंडेशन च्या माध्यमातून कशा प्रकारे विधायक कामे होतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहू. शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टींवर सध्या ठोस कार्य झाले पाहिजे आणि त्यासाठी योजनाही त्यांनी मांडली. पुढे ते म्हणाले की रायगड या सारख्या पवित्र ठिकाणी , शिवरायांच्या, हिरोजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, त्यांचे आशीर्वाद घेऊन "शिवक्रांती फौंडेशन" चे कार्य सुरू होतेय यापेक्षा मोठी ती गोष्ट कोणती? वडार समाजाचा अभिमान, स्वाभिमान असलेले श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा ज्वाजल्य अभिमान बाळगून आणि त्यांना आदर्श मानून वडार समाज प्रगती करेल. वडार समाजातील तरुण तरुणी यांनी हा आपला शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


महेंद्र पवार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले  की,रायगड हे आपल्यासाठी आणि वडार समाजासाठी तीर्थक्षेत्र आहे कारण आपल्या पूर्वजांनी आपले कौशल्य पणाला लावून याची निर्मिती केली आणि राजधानी ची निर्मिती केली. म्हणून आपण सर्वांनी याचा आदर्श घेत "शिवक्रांती फौंडेशन" च्या मधनातून समाजहितोपयोगी कार्य आपण यापुढे असेच चालू ठेऊ


नवनाथ धोत्रे महाराज आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की,सध्याच्या स्पर्धेच्या युगात वडार समाजाची अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. समाज शिक्षणापासून वंचित होतोय आणि गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून शिक्षण, रोजगार, व्यवसाय या त्रिसूत्री कार्यक्रमावर आधारित "शिवक्रांती फौंडेशन" चे कार्य असेल. वडार समाजाचे स्थापत्यकार श्रीमंत हिरोजी इटळकर  यांनी स्वराज्याच्या राजधानी मध्ये अद्भुत असे वास्तू बांधल्या , शिवरायांचे अनेक गडकिल्ले बांधले परंतु इतिहासकारांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आणि वडार समाजावर अन्याय केलेला आहे. म्हणून इथून पुढे वडार समाजाचे प्रेरणास्रोत्र हे श्रीमंत हिरोजी इटळकर असतील आणि आपण सर्वांनी मिळून खरा इतिहास जगासमोर आणू आणि वडार समाजालाही पुनः वैभव प्राप्त करून देऊन शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवू असा निर्धार व्यक्त केले.


पुण्याचे आय.टी. इंजिनिअर महादेव धोत्रे यांनी संबोधन करताना सांगितले की " वडार समाजातील लहान मुलांसाठी व तरुण तरुणींना कॉम्प्युटर चे ज्ञान देण्यासाठी आणि सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी "शिवक्रांती फौंडेशन" हे खेड्यापाड्यात आणि गाव वस्तीवर संगणक देण्याचा विचार करत आहे.  ज्यानेकरून संगणक हाताळणे आणि संगणक शिक्षण याचा प्रसार होईल.




तसेच श्रीमंत हिरोजी इटळकर यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या पायरीची मनोभावे पूजा करण्यात आले आणि श्रीफळ अर्पण करून "शिवक्रांती फौंडेशन" चे कार्य सुरू झाले आहे याची औपचारिक घोषणा करण्यात आली.*

*यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" आणि "श्रीमंत हिरोजी इटळकर यांचा विजय असो!" आणि "जय बजरंग, जय वडार" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवक्रांती फौंडेशन चे हे विधायक कार्य श्रीमंतांच्या दर्शनाने सुरू झाले याचे समाधान आलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक माननीय सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.*



त्यानंतर महाड मधील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदतीसाठी सर्व सदस्य महाड मध्ये पोहोचले.*

*महाड मधील श्री संत निरंकारी भवन येथे भेट घेऊन "शिवक्रांती फौंडेशन"च्या सदस्यांनी महाड मधील पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये संत निरांकरी मंडळ महाडचे सेवादल शिक्षक श्री सपकाळ महाराज, श्री बापू महाराज, श्री चंदू महाराज यांच्या सोबत तेथील परिसराचा आढावा घेण्यात आला. महापुरामुळे नुकसान झालेल्या बांधवांचे आणि कुटुंबियांचे सांत्वन "शिवक्रांती फौंडेशन" च्या वतीने करण्यात आले व त्यांना धीर देण्यात आला.महाड मधील आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या  कुटुंबियांना यावेळी "शिवक्रांती फौंडेशन"च्या वतीने किराणा मालाचे किट देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक महादेव धोत्रे तर आभार शंकर माने यांनी मानले.

test banner