पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी;राष्ट्रवादीच्या 'भगीरथ' प्रयत्नांना अपयश;तर भाजपाचे झाले 'समाधान' - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३ मे, २०२१

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी;राष्ट्रवादीच्या 'भगीरथ' प्रयत्नांना अपयश;तर भाजपाचे झाले 'समाधान'

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) स्व.आ. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे लागलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ही जागा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खेचून आणली आहे. भाजपचे समाधान आवताडे हे ३७३३ इतके मताधिक्‍य मिळवून विजय झाले आहेत. समाधान आवताडे यांना १,०९४५० मते, तर भगीरथ भालके यांना १,०५७१७ मते मिळाली आहेत. निवडणूक निकालानंतर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला.


पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदारांचा भाजपा तसेच समाधान आवताडे यांच्यावर विश्वास असल्याचे दिसून आले.या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी यांनी पक्षाची उमेदवारी देताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चाचपणी केली होती. समाधान आवताडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर, तर भगिरथ भालके यांनी सहानुभूतीच्या मुद्द्यावर मतदारांना आवाहन केले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांकडून दिग्गजांना प्रचारात उतरवण्यात आले होते. पण भाजपचा शिस्तबद्ध प्रचार व योग्य नियोजन यामुळे भाजपाचे कार्यकर्ते मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले होते. यामुळेच भाजपाला हा विजय सहज मिळवता आला आहे.


मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी घेतलेली आघाडी पुढे कायम ठेवली. पंढरपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी पंढरपूर शहर व तालुका भागातून अठराव्या फेरीत सुमारे एक हजार मतांची आघाडी आवताडे यांच्याकडे होती. परंतु मगळवेढा तालुक्यात भालके यांच्या प्रेम असल्यामुळे भावनिक मुद्दा जास्त तालुक्यात चालला भगीरथला चांगली मते मिळाली त्यामुळे भूमिपुत्र असलेले मंगळवेढा येथील समाधान  आवताडे यांना समाधानकारक मते मिळाले नसल्यामुळे कमी मताधिक्‍य मिळाले.

test banner