मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २५ मे, २०२१

मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोविड सेंटर साठी ऑक्सिजन कॉंन्संट्रेटर मशीन व मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट वितरण समारंभ संपन्न

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींनी उस्फुर्तपणे कोविड मदतनिधी उपक्रमात देणगी दिलेल्या सुमारे ७ लाख रुपये जमा झालेल्या रकमेतून ७ ऑक्सिजन काॅन्संट्रेटर मशीन, कोविड सेंटर साठी मेडिकल गोळ्या आणि आशा वर्कर यांना धान्याचे कीट भेट वितरण कार्यक्रम पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार समाधान दादा आवताडे यांचे अध्यक्षतेखाली मंगळवेढा येथे मंगळवार दिनांक २५ मे २०२१ रोजी दुपारी एक वाजता जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीचे सभागृह येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी  म्हणून प्रांत अधिकारी उदयससिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप खांडेकर, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण यांचे उपस्थितीत हस्तांतर सोहळा संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे सुरूवातीस कोविड आजाराने निधन झालेल्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक आणि नागरिक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या भाषणातून स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल आभार मानले आणि शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन कोविड संकट काळात आदर्शवत उपक्रम हाती घेतला याबद्दल अभिनंदन केले. शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच शासनाकडून मिळावे म्हणून राज्य सरकार व राज्यपाल यांना निवेदन दिले असून मयत शिक्षकांच्या वारसांना विमा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून आपण असेच कोविड काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 


  यावेळी प्रांत अधिकारी उदयसिंह भोसले यांनी आपल्या भाषणातून या कोरोना काळात एक जरी रूग्णांचा जीव वाचला तर फार मोठे पुण्ण्याचे काम होणार असल्याचे सांगितले.  तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी आपल्या भाषणातून मंगळवेढा तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिणींचे अभिनंदन केले आणि कोविड काळात महसूल प्रशासनास व आरोग्य विभागास सहकार्य करत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याबद्दल आभार मानले. 

    प्रास्ताविक व सूत्रसंचालन संभाजी तानगावडे यांनी केले तर कोविड विलिगीकरण गीत सादर करून आभार प्रदर्शन दत्तात्रय येडवे यांनी केले.

    सदर कार्यक्रमास तालुक्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांचे नेते, अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.

test banner