भाजपाच्या रणनितीमुळे बदलले पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे समीकरणे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

भाजपाच्या रणनितीमुळे बदलले पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे समीकरणे


सोलापूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार समाप्त होण्याच्या सोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन सुरू झाले आहे. भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपला उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. यासोबतच स्थानिक समीकरण बदलण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपाने केला आहे. मराठवाडामधील प्रभावशाली भाजपा नेत्यांद्वारे येथे जबरदस्त प्रचार केला गेल्यामुळे भाजपाचे बळ आणखी वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठीच गोंधळलेली आहे, कारण या विधानसभा मतदारसंघात भाजपा पहिल्यांदाच इतक्या प्रबळ शक्तीने समोर आला आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपा पहिल्यांदाच जातिगत समीकरण साधण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर भाजपा प्रभावशाली पक्ष म्हणून समोर आला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, या पोटनिवडणुकीत येथील जनतेने भाजपाचा विजय आधीच निश्चित केला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतदान होईपर्यंत सावधान आणि सतर्क राहण्याचे आवाहन करत सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सरकारमध्ये असल्यामुळे भाजपाच्या विरोधात आपली राजकीय खेळीसुद्धा खेळू शकते.


पंढरपूर विधानसभा क्षेत्रात २०१९च्या निवडणुकीत ३७.४८ % मतदान झाले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांनी भाजपाच्या सुधाकर परिचारक यांचा १३,३६१ मतांनी पराभव केला होता. मात्र आता परिचारक स्वतः समाधान आवताडे यांच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, ज्यामुळे भाजपाचे बळ आणखी वाढले आहे. या निवडणुकांमध्ये समाधान आवताडे यांच्या समर्थनात ५४ हजार मतं, त्यांच्या समर्थनार्थ प्रचार करत असणाऱ्या परिचारक यांचे ७३ हजार मतं, असे मिळून एकूण १.३० लाख मतांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ८७ हजार मतं फार कमी वाटतात. यासोबतच पाटील यांच्या राजकीय प्रबळ इच्छाशक्तीचा फायदा थेट पक्षाला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच या मतदारसंघात आधीच्या तुलनेत जास्त परिश्रम घ्यावे लागत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या तुलनेत चंद्रकांत दादा पाटील यांची आरएसएसची पार्श्वभूमी आणि त्यांचा साधेपणा येथील उमेदवारासाठी मोठे सामर्थ्य म्हणून सिद्ध होत आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडेदेखील येथे फार लोकप्रिय आहेत. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक कार्य केली असून जनतेशी त्यांचे चांगले संबंध आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या दोन दिवसीय पंढरपूर दौऱ्यात विविध जाती, समुदाय आणि अनेक घटकांमधील शेकडो लोकांसोबत केलेल्या वैयक्तिक बैठकीमुळे भाजपाचा विजय येथे निश्चित झाला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही मतदारसंघात जबरदस्त प्रचार करून भाजपाच्या समर्थनाला मजबुती देण्याचा प्रयत्न केला आहे.


या विधानसभा पोटनिवडणुकीत विजयासाठी भाजपाने प्रत्येक पातळीवरील आपल्या कॅडरला पूर्णपणे झोकून दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील मराठा असल्यामुळे येथे ५५ % मराठा समाजाचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे. याचे विशेष कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत अयशस्वी ठरला आहे. शरद पवार यांचा येथे खूप आदर केला जात असला तरी, निवडणुकीच्या दरम्यान २२% धनगर आणि ५५% मराठा समाजातील सर्वाधिक मतदारांचा कल भाजपाच्या दिशेने दिसून आला आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात भाजपाच्या समर्थनार्थ असणे फार सोपे झाले आहे.

test banner