मारोळी- बसव ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी मारोळी (ता.मंगळवेढा) येथील प्रा. सागर महादेव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी लिंगायत समाज वेगवेगळ्या पातळीवर राज्य व देश भर मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत आहेत.
लिंगायत समाजात अनेक पोटजाती आहेत त्यामुळे लिंगायत समाजाचे स्वतंत्र धर्म म्हणून गणना करण्यात यावे यासाठी समाज आग्रही आहे. लिंगायत समाजाचे धर्मगुरू श्री बसवेश्वर महाराज यांचे विचार संपूर्ण समाजामध्ये पोहोचावेत व त्यांच्या विचारानुसार समाजामध्ये आचरण करण्यात यावे यासाठी बसव ब्रिगेड कार्य करत आहे.लिंगायत समाजामध्ये जाती आणि पोटजाती आहेत त्या सर्वांना एकत्र घेवून येत्या 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये आपल्या लिंगायत धर्माला संविधानिक धर्म मान्यता मिळावी यासाठी सर्व जण एकत्र येऊन लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी कार्य करणार असल्याचे सागर पाटील याने सांगितले
संस्थापाक अध्यक्ष ॲड.अविनाश भोसीकर यांनी लिंगायत समाजातील कार्य बघून पाटील यांची निवड केली आहे. समाजासाठी चांगल नेतृत्व मिळावं ,लिंगायत धर्म मान्यतेला मान्यता मिळावी ,महात्मा बसवेश्वर याच मंगळवेढा येतील स्मारक लवकर होण्यासाठी चळवळ, महाराष्ट्रामध्ये लिंगायत धर्म जनजागृती, जनगणनेमध्ये एक वेगळा कॉलम तयार करून लिंगायत धर्माला मान्यता द्यावी, या सह अन्य मुख्य मागण्या घेऊन बसव ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कार्य करणार आहे.