मतदारसंघाचा सर्वांगीन विकास डोळ्यासमोर ठेवून निवडणूकीच्या मैदानात-सिध्देश्वर आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

मतदारसंघाचा सर्वांगीन विकास डोळ्यासमोर ठेवून निवडणूकीच्या मैदानात-सिध्देश्वर आवताडे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या चाळीस वर्षापासून पाण्याचे राजकारण होत आहे.मला पाण्याचे राजकारण न करता सुशिक्षित बेरोजगार आणि तालुक्याचा सर्वांगीन विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूकीच्या मैदानात उतरलो  असल्याचे प्रतिपादन सिध्देश्वर आवताडे यांनी केले आहे.

अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा नारळ जिल्हाचे नेते बबनराव आवताडे यांनी  माचनुर (ता. मंगळवेढा) येथील सिध्देश्वर मंदिरात फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हाचे नेते बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे संचालक लक्ष्मण नरुटे, पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत ढोणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे, विठ्ठल घुले,नंदकुमार पडवळे,दामाजी नगरचे सरपंच अॕड.दत्तात्रय तोडकरी,समाधान घोडके,सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, विजय भोसले,युवराज घुले,माजी सदस्य संजय पवार जनार्धन डोरले, सुहास पवार,आनंदा पाटील, चनबसू येणपे,अँड.इरफान सय्यद, अँड.गुरुराज बुरुकुल आदीजन उपस्थित होते.


सिध्देश्वर आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक गेली 40 वर्ष झाले.म्हैसाळ ,तेलधोंडा आणि मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर लढविली जात आहे. हा प्रश्न व्यवस्थित शासन दरबारी मांडून सोडविणे शक्य असले तरी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ते चुकीच्या पद्धतीने मांडून लाभार्थी गावातील शेतकरी, नागरिकांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळेच हक्काच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत. इतर प्रश्न न सोडविता त्याचे फक्त भांडवल केल्यामुळे लोक हक्काच्या योजनांपासून वंचित असून या योजनांना आपले प्रथम प्राधान्य देणार असून सुशिक्षित बेरोजगार आणि तालुक्याचा सर्वांगीन विकास करण्यावर भर असल्याचे सिध्देश्वर आवताडे यांनी मतदारांना आश्वासन दिले.

                                                                          संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षिरसागर म्हणाले की, सर्वानी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पण सिद्धेश्वर आवताडे हे कधी प्रचार सुरु करतात सगळ्यांना उत्सुकता लागली होती पण आम्हांला ज्या ताकतीने प्रचाराची सुरूवात करायचं होते तितक्याच ताकतीने प्रचाराची सुरुवात झाली आहे. एका बाजूला पैशावर तोलणारी माणसे आहेत.तर दुसऱ्या बाजूला सर्व जनता व कार्यकर्ते सोबत असलेली माणसे आहेत.गेल्या चाळीस वर्ष बबनराव आवताडे यांनी तालुक्याच्या विकासा बरोबर समाजकार्य केलेले आहे.आपल्याला मतदान करुन उपकारांची परतफेड करायचं आहे.बाहेरून अनेक नेते प्रचारासाठी मतदारसंघात दाखल झाले आहेत.पण त्या माहिती नाही की येथील जनता स्वाभिमान असून अजून जनतेचा पाठीचा कणा मजबुत असल्याचे ठणकावून सांगितले.येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सिध्देश्वर आवताडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.


test banner