राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाची फसवणूक केली : आ. गोपीचंद पडळकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाची फसवणूक केली : आ. गोपीचंद पडळकर


 मंळवेढा(प्रतिनिधी) राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाची फसवणूक केल्या असल्याची घणाघाती टीका विधानपरिषद आ.गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. 


याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,उपाध्यक्ष सुभाष मस्के,बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली हलणवर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,सिध्देश्वर कोकरे, माजी नगरसेवक चंद्रकांत पडवळे,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, धनगर समाजाचे नेते बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे,भारत गंरडे,चंद्रकांत गंरडे, अंकुश गरंडे, तात्यासाहेब दोलतडे, आकाश डांगे, दत्ता साबणे आदीजन उपस्थित होते.



आ.पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, धनगर समाजाला मदत करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी अनेक योजना लागू केल्या होत्या. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनगर समाजाची फसवणूक करुन अनेक योजना बंद करण्याचे पाप यांनी केले आहे. यांना मते देऊन सुद्धा त्यांनी न्याय दिला नाही त्यांना आता जागा दाखवायची वेळ आली आहे. तसेच या सरकारने शेतकऱ्यांना काडीमात्र मदत केली नाही आशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. लॉकडाऊन करून सरकार गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर सर्वांनी जाऊन पाहिले आपल्या 35 गावाच्या पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत निवडुन आले आहेत. येथील मजूर ऊसतोडणीसाठी या सरकारला हवा आहे म्हणून 35 गावातील शेतकऱ्यांना हे सरकार पाणी देत नाही. समाधान आवताडे यांना निवडून दिल्या नंतर  35 गावला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विठ्ठल कारखाना कर्जाच्या खाईत नेला आहे. शेतकरी बिलासाठी आंदोलन करत आहेत ते आपला काय विकास करणार आता, हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अनेक संकटे आली आहेत. इतर राज्यात कोरोनाची संख्या कमी आहे. पण महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे याचे कारण शोधणे गरजेचे असल्याचे आ.पडळकर यांनी सांगितले.


सभापती सोमनाथ आवताडे म्हणाले की, समाधान आवताडे यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना आज त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. आत्तापर्यंत डाळींब सौदे असो,जनावरांचा बाजार असो असे अनेक शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष देशमुख बोलताना म्हणाले की, राज्याचे समीकरण बदलणारी ही निवडणूक असून शेतकरी विरोधी या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. दाखवायचा चेहरा एक बोलणे वेगळी अशी राष्ट्रवादी ची अवस्था आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना समाधान आवताडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. उद्या आमदार झाले तर मतदारसंघात असलेली बेरोजगारी कायम निघून जाईल अनेक कुटुंब उभे राहतील असे त्यांनी सांगितले.

test banner