मंगळवेढा(प्रतिनिधी )कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अशा वेळी सरकारने दिलासा दिला नाही, संकट काळात जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे काम केले त्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही त्यांना केवळ राज्याची लूट करायची आहे त्यामुळे हे सरकार लुटारू असून ते आपल्या भागाचा विकास काय करणार असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.
पुढे सदाभाऊ खोत बोलताना म्हणाले की,समाधान आवताडे यांची सत्ता जर दामाजी कारखान्यावर आली नसती तर सभासदांना दहा ग्रॅम सुद्धा साखर मिळाली नसती त्यांचे या मातीवर जिवापाड प्रेम आहे यासाठी त्यांनी सूतगिरणी उभा करून शेकडो तरुणांना रोजगार दिला सत्ता नसताना सर्वसामान्यांची कामे करणारा, कर्तबगारी दाखवणारा उमेदवार मिळाला असून तालुक्याला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सुमारे 50 हजारांचे मताधिक्य द्या.यंदा भाकरी फिरवायची वेळ आली आहे भाकरी फिरवली नाही तर करपून जाईल त्यामुळे एकदा आपल्या मातीतला पोरगा विधानसभेत पाठवूया. आ. राम सातपुते बोलताणा म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला, या सरकारने शेतकऱ्यांची वीज कट केली, भाजपच्या पाच वर्षात असे कधी झाले होते का? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नावे एकरी 25 हजार देण्याची घोषणा केली दिले का पैसे? त्यामुळे हे सरकार जुलमी असून इंग्रजी राजवटीपेक्षा वाईट आहे.लक्ष्मी ही घड्याळावर येत नाही, अपक्षाच्या काठीवर येत नाही तर लक्ष्मी ही कमळावर बसून येते म्हणून भाजपला मतदान करा. बारामतीकरांनी मंगळवेढा-माळशिरसच्या हक्काचे पाणी पळवले, त्यांना धडा शिकवा, ही निवडणूक आमच्या हक्काचे पाणी मिळवायची आहे, म्हणून यंदा परिवर्तन घडवा असे आवाहन आ.राम सातपुते यांनी केले.
या प्रचारदौऱ्यात उपस्थित भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे,रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक जाधव,आ.राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजप माजी जिल्हाध्यक्ष शहाजीबापू पवार,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,सचिन शिवशरण,दुध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे, युनूस शेख, नंदकुमार हावनाळे, मिस्टर पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मस्के,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे,भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिन्द्र भोसले, दिगंबर यादव,अशोक उन्हाळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा