पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय-आनंद शिंदें - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय-आनंद शिंदें

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, अशी गर्जना करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लोकगायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून टोला हाणला. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा इशारा आनंद शिंदेंनी दिला.                               यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ.रोहित पावर, आ.अमोल मेटाकरी, राष्ट्रवादी युवक प्रदेशध्क्षाय महेबूब शेख, जेष्ठ नेते रामभाऊ वाकडे, नगराध्याक्षा अरुणा माळी, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा,विजय खवतोडे,पक्षनेते अजित जगताप,न.पा बाधंकाम सभापती प्रविण खवतोडे,राष्ट्रवादी शहरध्याक्ष मुजम्मिल काझी, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर दत्तू,सोमनाथ माळी,  मुरलीधर घुले,ज्ञानेश्वर भगरे ,महादेव जाधव,अरुण किल्लेदार,चंद्रशेखर कोंडुभैरी,कॉग्रेस आयचे शहरध्याक्ष संदिप फडतरे,संदिप बुरकुल, प्रज्वल शिंदे, सोमा बुराजे,  सचिन शिंदे, संदिप मांडवे,राहूल वाकडे,अजित यादव आदि उपस्थित होते.                                                               पुढे बोलताना म्हणाले स्व नाना यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. नानाशी मैत्रीपूर्ण संबंध आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन शिंदेंनी केले.                                                                                        लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.                                                            याला उत्तर देताना फडणवीसांच्या वक्तव्याचा गाण्यातून समाचार....

आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला.

test banner