डोंगरगावात शेतकऱ्यांचा मेळाव्याला चांगला प्रतिसाद
मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदार संघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.भाजपा प्रचारार्थ डोंगरगाव येथिल लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी मैदान येथे शेतकरी मेळावा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली व आयोजक आदित्य हिंदुस्तानी होते. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोटनिवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे यात कोणाला यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देव्रेंद्र फडवणीस यांनी सांगितले लोकशाहीचे सरकारला नसुन लाॅकशाहीचे सरकार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्यासारख्या तरुण व विकासात्मक नेतृत्वाला संधी द्या व महावसुली सरकारला मोठा शॉक येत्या २ मेला द्या असे आवाहन त्यांनी केले. या मतदारसंघात अवताडे विजयी झाले की ते या भागातील दुसरा आमदार ते असणार आहे. प्रशांत परिचारक हे सध्या विधान परिषदेत काम करत आहेत त्यांना अवताडे यांची साथ मिळत व विकासाची गाडी या डबल इंजिना मार्फत आपण असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सामाजिक कार्याची आवड मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित आहे.
माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,भाजप नेत्या चित्रा वाघ,आ.प्रशांत परिचारक,माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख,माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ.गोपीचंद पडळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी,धैर्यशील मोहिते पाटील,माजी मंत्री राम शिंदे, आ.राम सातपुते, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा सरचिटणिस शशिकांत चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी, तुळशीदास करांडे, विवेक खिलारे आदीजन उपस्थित होते.