समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले 'डोक्यावर' मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले 'डोक्यावर' मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा

 


पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबत संपूर्ण पंढरपूर शहर पिंजून काढले, महात्मा फुले चौकातून निघालेली ही पदयात्रा आंबेडकर चौक, गजानन महाराज पिछाडी, भक्ती मार्ग, बागवान मोहल्ला, अण्णाभाऊ साठे नगर यासह शहराच्या अनेक भागातून ही रॅली निघाली, युवकांचा मोठा प्रतिसाद या रॅलीत होता, आंबेडकर नगर तसेच अण्णाभाऊ साठे नगरातील बौद्ध, मातंग बांधवांनी उमेदवार समाधान आवताडे यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि हार घालून जोरदार स्वागत केले अनेक ठिकाणी महिलांनी आवताडे तसेच आमदार प्रशांत परिचारक यांना औक्षण केले. विशेष म्हणजे पंढरपूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी उमेदवार अवताडे यांचे स्वागत केले अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले अनेकांसोबत आवताडे यांनी चहा घेतला उमेदवार म्हणून अवताडे यांना पंढरपूर शहरात ही चांगली पसंती दिली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या पदयात्रेत मध्ये परिचारक गटाचे अनेक नगरसेवक , शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, कोळी महासंघ या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 


  पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पंढरपूर आणि मंगळवेढा या दौऱ्यावर होते त्यांची पंढरपूर शहरात शेवटची सभा होती या सभेवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी अध्यक्ष भगीरथ भालके यांना जोरदार धक्का देत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना आपला  पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत विठ्ठल कारखान्याच्या अनेक शेतकरी सभासदांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना पसंती दिल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यात आहे. याच दरम्यान विठ्ठल परिवारातील हिम्मतराव आसबे यांनी आपल्या समर्थकांसह भाजप मध्ये प्रवेश करत उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला. भाजपने विठ्ठल परिवाराचा ब्रेन हायजॅक केल्याची चर्चा सुरू आहे

test banner