संत तुकारामांचा विचार जगण्याचा आधार- भारत शिंदे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

संत तुकारामांचा विचार जगण्याचा आधार- भारत शिंदे

 


अवघ्या मराठी मातीच्या रक्तात भक्तीच्या आणि विचारशक्तीच्या सामर्थ्याने भिनलेले संत तुकराम महाराज हे आपले आद्य आधिष्ठान आहेत. जीवनसार सांगणारे, कठीण प्रसंगातही कणखर बनायला लावणारे विचारसामर्थ्य शब्दांतून प्रकट करणारे तुकोबाराय आमच्या अनेक पिढ्यांवर उपकार करणारे जगद्गुरू आहेत. संत तुकारामांचा विचार बहुजनांच्या जगण्याचा आधार आहे असे विचार भारत शिंदे गुरुजी यांनी मांडले. ते मंगळवेढ्यातील जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत असलेले मंगळवेढा नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अ‍ॅड. नंदकुमार पवार, डॉ. सुभाष कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, नगरसेविका अनिताताई नागणे, अ‍ॅड. विनायक नागणे, कवी शिवाजी सातपुते, निलाताई आटकळे, हर्षद डोरले प्रमुख उपस्थितीत होते. 

संतांच्या विचार सोहळ्यासाठी व तो विचार लोकोत्तर होण्यासाठी नगर परिषद पालकत्वाच्या नात्याने प्रयत्न करील. त्याच बरोबर विचारांसाठी झटणार्‍या प्रकाशदायी पणत्या सतत तेवत राहतात हाच खरा समाजाचा कणा आहे. त्यांच्या सततच्या तेवत राहण्याने हा विचार अधिक मोठा होणार आहे असे या प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपले विचार व्यक्त केले. 

जयंतीच्या औचित्याने साजर्‍या झालेल्या विचारसोहळ्यामध्ये जमीर इनामदार यांनी संत तुकारामांचा निसर्गप्रेमाचा विचार व्यक्त केला. पै. मारुती बापू वाकडे यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी मंगळवेढ्याच्या मातीतील महत्त्वपूर्ण ठेवा जतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेविका अनिताताई नागणे यांनी आपल्या भाषणातून नियोजित कार्यक्रमाचे कौतुक करून जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने मंचावर फक्त संतांची प्रतिमा ठेवून आगळेवेगळे नियोजन केल्याचे नमूद करत संतांचे मौलिक विचार मांडले. या जयंती सोहळ्यास दै. दिव्य मराठीचे पत्रकार प्रशांत मोरे,  समाधान क्षीरसागर, अभिजीत शिंदे, संदीप घुले, संदीप फडतरे, हर्षद डोरले आदी मान्यवर उपस्थित होते. विचार दर्शनाच्या प्रकटणीकरणाने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले यांनी केले, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश मुळिक यांनी स्वागत केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. राहूल घुले यांनी केले.

test banner