मंगळवेढा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हाचे पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी कार्याभार स्विकारल्यानंतर तालुका प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देऊन ही मंगळवेढा शहरात मात्र खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याचे मटक्याच्या चिट्टीवरुन दिसत असल्याने कोण म्हणत्य मटका बंद हा घ्या पुरावा असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. लॉकडाऊन कालावधी मध्ये मटका बंद असल्याने गोरगरीबांचे संसार सुरळित चालू असल्याचे समाधान व्यक्त होत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काहीने मध्यस्थित करून मटका सुरु केला. आज हा मटका शहरातील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्थानक परिसर ,दामाजी रोड,नवीन भाजी मंडई ,शिवप्रेमी,चोखामेळा चोक, बोराळ नाका, जुनी भाजी मंडई,व खोमनळ नाका परिसरात चोरी चोरी छुपके छुपके चालणारा खुले आम पद्धतीने हा मटका डोके वर काढु पाहत आहे. पंढरपूर उपविभागीय पोलिस कार्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांने मंगळवेढा शहरात येऊन बाजार चौकात चालणाऱ्या मटक्या घेणाऱ्या दोघा विरोध गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही या मटका व्यवसाकांना पोलिस अधिकारी यांची भिती राहलेली नाही. परिणामी दुसऱ्या दिवशीच मटक्याच्या चिट्टीया प्रसार माध्यमाच्या हाती लागली आहेत . या चिट्टी वरुन मटका सुरू असल्याचे उघड झाले आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी त्याच्या कालावधीत मटका हदपार केल्याने मोडकळीस अलेले गोरगरीबांचे संसार पुन्हा नव्या जोमाने उभारण्यात आल्याने महिला वर्गातून त्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत होते. मटका हा खेळणारानां आशा लावून गिळू पाहत असल्याने अनेकांनाचे संसार रस्त्यावर आले आहेत. प्रामुख्याने या व्यवसाय मध्ये गरीब मजूर वर्ग भरडला जाऊन त्यांच्या नशिबी दारिद्रय येऊ पाहत असल्याचे चित्र आहे. मंगळवेढा शहरात तिघे बुकी चालक असून प्रत्यक्षात एंजटदारांना बळी दिले जात असल्याने झाडांचा बुंधा ठेवून केवळ फांद्या छाटण्याचे काम पोलिस प्रशासन करित असल्याच्या तिखट प्रतिक्रिया नागरिकांना मधून व्यक्त आहेत. कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते काय कारवाई करणार याकडे तमाम मंगळवेढा शहरवासियचे लक्ष लागले आहे. फोटो ओळी:- मंगळवेढा शहरातील मटक्याचा चिठ्ठीचा हा घ्या पुरावा
मंगळवार, २ मार्च, २०२१
Home
महाराष्ट्र
राजकीय
पोलिस अधिक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देऊन ही मंगळवेढा शहरात मटक्याच्या चिठ्या आढळू लागल्या!
पोलिस अधिक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देऊन ही मंगळवेढा शहरात मटक्याच्या चिठ्या आढळू लागल्या!
Tags
# महाराष्ट्र
# राजकीय
About Mahadev Dhotre
राजकीय
Labels:
महाराष्ट्र,
राजकीय