मंगळवेढ्यात पतंजली योग प्राणायाम वर्ग सुरू - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

मंगळवेढ्यात पतंजली योग प्राणायाम वर्ग सुरू

 


टीम संवाद न्यूज - मंगळवेढा 


 विश्वगुरु योगाचार्य स्वामी रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली  पतंजली योग समिती,मंगळवेढा मार्फत शहरात विविध ठिकाणी मोफत योग वर्ग घेतले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे सामुदायिक योगवर्ग बंद करण्यात आले होते. गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेला योग वर्ग महाराष्ट्र शासनाने पाच नोव्हेंबर पासून सर्वत्र घेण्यास परवानगी दिलेली आहे. या धर्तीवर जवाहरलाल हायस्कूल येथील निशुल्क योग प्राणायाम वर्ग शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर पासून दररोज पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत सुरू करण्यात आला आहे. 2008 पासून सुरू झालेला हा योग वर्ग मंगळवेढा तालुक्यातील पहिला मोफत योग वर्ग आहे. या योगवर्गातून आतापर्यंत हजारो नागरिकांनी योगाचे धडे घेऊन विविध आजारांवर मात केलेली आहे. पतंजली योग समिती  मंगळवेढा यांच्यावतीने  कोरोना काळातदेखील  कोरोना रुग्णासाठी वीरशैव मंगलकार्यालय या ठिकाणी मोफत योग प्राणायाम शिबीर घेण्यात आले होते. याशिवाय  आयुर्वेदिक दिव्य वनस्पती  गुळवेल, अश्वगंधा, आवळा  यांचे मोफत वाटप देखील करण्यात आले होते.  याशिवाय जलनेतीसारख्या शरीरशुद्धी क्रियेद्वारे कोरोना पासून  आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो  हेदेखील समितीच्या वतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्यात आलेले आहे. या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर या योगवर्गातून रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी विविध प्राणायाम, आसने, ध्यान,ॲक्युप्रेशर ,घरगुती औषधे इत्यादीचे मार्गदर्शन  केले जात असल्याची माहिती पतंजली जिल्हाध्यक्ष नितीन मोरे यांनी दिली. या वर्गामध्ये वेळोवेळी भारत स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संतोष दुधाळ, योगशिक्षक  शिवकुमार स्वामी, धर्मराज जाधव, प्रफुल्लता स्वामी यांचे मार्गदर्शन योग साधकांना मिळत असते. हा वर्ग निशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ  घेऊन आपले आरोग्य सुदृढ करावे व कोरोना पासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे असे आवाहन पतंजली तालुकाध्यक्ष आगतराव बिले यांनी केले .

test banner