ढवळस शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.... कार्यक्रम पाहून गावकरी गेले भारावून..... - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

ढवळस शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.... कार्यक्रम पाहून गावकरी गेले भारावून.....


 मंगळवेढा(प्रतिनिधी )जिल्हा परिषद शाळेमध्ये २६ जानेवारी सकाळी 7:30 वाजता प्रभात फेरी काढून वेगवेगळ्या घोषणा देऊन गावामध्ये जनजागृती करून ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्वप्रथम घेण्यात आला  तद्नंतर सर्व ग्रामस्थांना शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले.सर्व विद्यार्थी पालक शिक्षणप्रेमी नागरिक सरपंच सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळेच्या प्रांगणामध्ये अगदी मनापासून उपस्थित राहिले.शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंपूशेठ मोरे यांच्या शुभहस्ते झाले या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने शाळेमध्ये सर्वप्रथम खडे-बैठे कवायत तसेच  विद्यार्थ्यांचे साहित्य कवायत पाहून सर्वांची मने अगदी आनंदाने भरून गेली, विविध रंगीबेरंगी कागदांनी सजलेली साहित्य पाहून सर्व उपस्थित नागरिकांना विद्यार्थी व शाळेविषयी एक वेगळीचं आत्मीयता निर्माण झाली,यानंतर मोजकी भाषणे घेण्यात आली यामध्ये इयत्ता निहाय सर्व मुला-मुलींनी सहभाग नोंदवला तर नंतर सांस्कृतीक कार्यक्रम सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने बालगोपाळांच्या कलागुणांना प्रेरित करण्यासाठी आलेल्या सर्व शिक्षणप्रेमी सुजान नागरिकांचा आजचा दिलेला खरा वेळ सार्थकी लावला या कार्यक्रमात मध्ये आम्ही करितो नमन या गणपती देवाच्या गाण्याला सर्व रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि सर्वांनी बक्षिसांचा वर्षाव केला. तसेच तेरी मित्ती मे मिल जावा,जलवा-जलवा,मैने पायल है छनकाई,पिंगा ग पोरी पिंगा या सर्व गाण्यावर सुरेख नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी मरूळवस्ती शाळेच्या बालकलाकारांनी इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे या गीतावर सर्व उपस्थितांना भाऊक केले आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांच्या डोळ्यांच्या कडा अलगदपणे या बाळचमूने ओल्या केल्या. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पनेतून अडगळीत पडलेल्या सर्व वस्तू बाजूला करून त्या वर्ग खोलीमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा तयार केली त्या प्रयोगशाळेचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले
या कार्यक्रम प्रसंगी टॅलेंन्ट हंट स्पर्धेमध्ये तालुका प्रथम आलेल्या पाच मुलींना सरपंच सिद्धेश्वर मोरे यांच्याकडून स्कूल बॅग तर मा.उपसरपंच सौ.राधिका हेंबाडे यांच्याकडून स्क्वायर वही भेट देण्यात आली,लंगडी स्पर्धेत तालुका प्रथम आलेल्या लहान गट व मोठा गट ३० मुलींना कंपास पेटी बक्षीस म्हणून अध्यक्ष पंपूशेट मोरे यांनी दिले. सोशल फाउंडेशन सोलापूर यांनी आयोजित केलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या मुलींना उपाध्यक्ष सौ. मयुरी हेंबाडे यांच्याकडून कंपास पेटी बक्षीस देण्यात आले.अंजठा अकॅडमी सांगोला यांच्याकडून घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत विजेत्या दीप्ती साहेबराव गायकवाड व प्रणव पंपूशेठ मोरे या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शिक्षणप्रेमी मा.श्री.आबासाहेब गायकवाड यांनी सहा पाण्याचे थर्मास जार भेट दिले. नवनाथ सिद्धेश्वर हेंबाडे यांनी कै.भानुदास हेंबाडे यांच्या स्मरणार्थ शाळेला डाएस भेट दिला.उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा कलागुण पाहून भरपूर बक्षिसांचा वर्षाव केला सदर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व शिक्षण प्रेमी सुजाण नागरिक व महिलांची वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जाधव गुरुजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.दत्तात्रय हेंबाडे, श्रा.सुदर्शन शेजाळ,श्री.विजय गायकवाड श्रीम.राजश्री माळी मॅडम, मरूवस्ती शाळेच्या मुख्या.श्रीम.पोरे मॅडम श्रीमती तानगे मॅडम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय लेंडवे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी सुळकुंडे यांनी मानले.
test banner