मंगळवेढा(प्रतिनिधी) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकारिता करत असलेले मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद(शे)येथील पत्रकार दत्तात्रय शिवाजी नवत्रे यांना आचार्य दादासाहेब दोंदे जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवारी दु 12 वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे नेते संभाजीराव थोरात व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा येथे होणार आहे .
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अंतर्गत मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार दिले जातात यामध्ये शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव करण्यात येतो यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात नेहमी वेगळेपण जपणाऱ्या,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,शेतीविषयक,प्रशासकीय यंत्रणेविषयी परखड लेखन करत सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या दत्तात्रय नवत्रे यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण,सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सुर्यकांत ढोणे नगराध्यक्षा अरुणा माळी, राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण ,मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, प्रशासन अधिकारी शाहू सतपाल, सोलापूर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, सोसायटी चेअरमन बब्रुवाहन काशीद, प्राथमिक शिक्षक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाराणी आतकर, सल्लागार अरुण डोरले यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षक,आदर्श शाळा,आदर्श यांनाही सन्मानित करण्यात येणार असून विद्या प्रतिष्ठान बारामती चे प्राध्यापक राजकुमार कदम यांचे व्याख्यानही होणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी शिक्षक संघ यांचेकडून करण्यात आले आहे.