युटोपियन शुगर्स  कडून मृताच्या नातेवाईकास तीन लाख  रकमेचा विमा धनादेश सुपूर्द - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

युटोपियन शुगर्स  कडून मृताच्या नातेवाईकास तीन लाख  रकमेचा विमा धनादेश सुपूर्द





मंगळवेढा(प्रतिनिधी )युटोपियन शुगर्स ली. कचरेवाडी येथील ऊस ठेकेदार संजय बाळकृष्ण जाधव यांच्या कडे ऊस तोड मजूर म्हणून काम करत असणारे  संजय दिगंबर ठाकरस रा. बेलोरा ता.पुसद जी.यवतमाळ यांचा ऊसाची वाहतूक करतेवेळी दि. २०/१२/२०१८ रोजी अपघात होऊन मृत्यू झाला.  युटोपियन शुगर्स  ने कारखान्या अंतर्गत  सर्व ऊस  वाहतूक ,ऊस तोड करणारे मजूर यांच्या सुरक्षिततेची  जबाबदारी म्हणून  दि न्यू  इंडिया इन्शुरन्स कंपनी  यांचे कडे विमा पॉलिसी उतरविला होता. कै. संजय ठाकरस हे दुर्दैवी अपघातात मयत झाले नंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी विमा कंपनी कडे सातत्याने पाठपुरावा करीत आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली व  आज  दि. ११/१२/२०१९ रोजी रक्कम रुपये ३०००००/- (अक्षरी :- तीन लाख फक्त) इतक्या रकमेचा धनादेश कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या हस्ते मृताचे वारस पत्नी श्रीमती लताबाई संजय ठाकरस यांना देण्यात आला
           या वेळी बोलताना कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की,कुटुंबातील कर्ता व्यक्ती चे अचानक निधन झाल्याने कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींना आधार देण्याचे कार्य विमा कंपनी करीत असतात. त्यामुळे विमा ही अत्यंत गरजेची गोष्ट असल्याने याचा उपयोग सर्वांनी करणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही युटोपियन शुगर्स ने आपले स्थान निर्माण केले आहे.  कामगार,मजूर यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने सामाजिक जाणिवेचा  एक भाग म्हणून युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने  ने विमा उतरवीत आलो.

फोटो ओळी:  संजय दिगंबर ठाकरस  यांच्या पत्नी श्रीमती  लताबाई संजय ठाकरस  यांना विमा रकमेचा धनादेश देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक  उत्तमराव पाटील,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,ऊस पुरवठा अधिकारी कृष्णात ठवरे व उपस्थित कर्मचारी वर्ग दिसत आहेत. 

test banner