प्रतीनिधी :
मंगळवेढा मराठा सेवा संघाच्या वतीने आ.भारतनाना भालके यांचा सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आमदार निवास्थानी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा वधू वर सूचक कक्षाचे विशेष कौतुक करताना आमदार म्हणाले " मराठा समाजातील बांधवांनी लग्नावर होणारा अवाढव्य खर्च कमी केला तर बर्याच समस्या सुटण्यास मदत होईल, सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची मानसिकता बनवली तर समाजाला त्याचा खूपच फायदा होईल. "
तसेच सेवा संघाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे सुद्धा कौतुक केले. समाजात जागरूकता निर्माण करून जास्तीत जास्त निधि वाचनालय , व्यायामशाळा यांना निधि देता आला तर मला आमदार म्हणून आनंद होईल. अशी भावना व्यक्त केली.
मागील काही वर्षापासून सेवा संघाच्या माध्यमातून होणार्या विविध कार्यक्रमाची माहिती दिलीप जाधव आणि गणेश यादव सर यांनी दिली.
"सेवा संघाच्या लोकोपयोगी उपक्रमात माझ्या कडून शक्य तेवढी मदत मी नक्की करणार आणि तुम्ही ही तुमची चळवळ अशीच चालू ठेवा ही काळाची गरज आहे "अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी दिलीप जाधव, गणेश यादव, प्रकाश मुळीक, अनिल पाटील, अभिजीत शिंदे, गोरख काकडे, विशाल निबाळकर आदि उपस्थित होते.