प्रतीनिधि
मराठा सेवा संघ मंगळवेढा , संभाजी ब्रिगेड मंगळवेढा यांनी बलिप्रतिपदेला लोककल्याणकारी राजा बळीराजाला विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला.
संत दामाजी मंदिर परिसरात सजवलेली बैलगाडीआणून बळीराजाच्या मोठ्या प्रतिमेचे पूजन गावातील कष्टकरी , शेतकरी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित शेतकर्यांचा मंगळवेढा नगरीचे उपनगराध्यक्ष चंद्र्कांत घुले आणि बाजार समितीचे सभापति सोमनाथजी आवताडे यांनी सत्कार करून शेतकर्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवि इंद्रजीत घुले यांनी केले बळीराजाला संभिभावी का म्हटले जाते या बद्दल डॉ. आ.ह. साळुंखे सरांनी केलेल्या संशोधनाचे दाखले देत सर्वांना समान न्याय देणारा राजा असे संगितले.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष समाधान क्षीरसागर यांनी बळीराजबद्दल समाजात असणारी माहिती ही अल्प असून काही चुकीचीही असल्याचे संगितले आणि पुढे अश्या प्रकारचे कार्यक्रम घेवून लोक जागृती करू असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला अनिल पाटील, बाळासाहेब सावंत, सुरेश धनवे, मारुती गोवे, रामचंद्र हेंबाडे, दिलीप जाधव, आप्पा मुढे, शिवाजी वाकडे, आनंद जावळे, भोजने साहेब, प्रकाश मुळीक, सतिश दत्तू, अभिजित शिंदे, गणेश यादव प्रकाश जावळे, येताळा खरबडे, भारत शिंदे, शिवाजी सातपुते, मुरडे साहेब, बुवा गायकवाड, धर्मराज जाधव, उत्तम अवघडे इ. मान्यवर उपस्थित होते.
दामाजी चौकात बळीराजाचे मोठे डिजिटल पोस्टर पाहून सजवलेली बैलगाडी पाहून अनेक नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते मराठा सेवा संघाकडून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आणि पुढच्या वर्षी आम्हालाही सहभागी करून घेण्याबद्दल विनंती केली.