सत्तेचा गैरवापर करून, शेतकर्‍याना दुख: देणार्‍या सरकारला घरी पाठवा : शरद पवार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

सत्तेचा गैरवापर करून, शेतकर्‍याना दुख: देणार्‍या सरकारला घरी पाठवा : शरद पवार




प्रतीनिधी (पंढरपूर )
आ.भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूरमध्ये शिवतीर्थवर झालेल्या विराट  सभेत बोलताना मा.खा. शरद पवार म्हणाले “
कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारनं लोकांना फसवले आहे. या पाच वर्षात महाराष्ट्रातील १६००० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.  उद्योग धंदे डबघाईला आलेले आहेत, कारखाने बंद पडत आहे, लोकांच्या नोकर्‍या जात आहेत. बेरोजगारी वाढत आहे. हे सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरत आहे. काही मूठभर लोकांच्या हितासाठी राज्याचे वाटोळे करण्याचे धंदे ह्या लोकांनी सुरू केले आहेत. पण यांना आता सत्तेपासून बाजूला करण्याची वेळ आली आहे.”   

ईडी ने मलाही काही संबध नसताना नोटिस काढली. जेव्हा मी स्वत: हून चौकशीला सामोरे जातोय म्हटल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यापासून सर्वांनी तुम्ही येवू नका तशी काही गरज वाटतं नाही असा पवित्र घेतला. पण ईडी ला सुद्धा येड लावण्याची धमक आमच्या आहे. आम्ही काय मेलेल्या आईच दूध प्यायलो नाही.  ईडी, सीबीआय अश्या संस्थाचा गैरवापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय. 

सुरवातीलच त्यांनी म्हटले “ मी नेहमीच इथे येतो. पण आज काहीतरी वेगळं वाटतय, तुमचं ठरलय वाटतं नानाला आमदार करायचं  
त्यामुळे हे सरकार आता जाणार आणि २४ तारखेला गुलाल आपणच उधळणार.
मतदार संघाच्या विकास कामाचे प्रश्न सोडवताना मी, सुशीलकुमार शिंदे आम्ही सर्व भालकेना ताकद देवू. तुम्ही त्यांना प्रचंड बहुमतानी निवडून द्या.समोर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. लोकांचा हा उत्साह आणि उस्फूर्त प्रतिक्रिया ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी दिसून आल्या. 

test banner