पक्षाचा आदेश न पाळणार्‍या काळुंगे सरांना मत देवू नका आघाडीच्या भारत भालकेयांनाच मत दया - सुशीलकुमार शिंदे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

पक्षाचा आदेश न पाळणार्‍या काळुंगे सरांना मत देवू नका आघाडीच्या भारत भालकेयांनाच मत दया - सुशीलकुमार शिंदे



प्रतीनिधी :
पक्षाचा आदेश न पाळता अर्ज ठेवलेल्या प्रा.शिवाजी काळुंगे सरांना कॉंग्रेस म्हणून मत देवू नका. आघाडीचा उमेदवार आ. भारत भालके यांच्या घड्याळला मत द्या. असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आज पंढरपूर येथील प्रचार सभेत केले.

कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करणार्‍या प्रा. शिवाजी काळुंगे सरांना मा. सुशीलकुमार शिंदेनी मोठी चपराक लगावली आहे. अर्ज काढून घेण्याचा आदेश दिला असताना सरांनी अर्ज ठेवून गोंधळ अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश पाटील व तालुका अध्यक्ष सुरेश कोळेकर यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत  सरांच्या घरी ठाण मांडून बसले होते पण सर त्यांना सापडले नाही.  त्यामुळे त्यांचे राजकारणातील सर्वस्व असणार्‍या  सुशीलकुमार शिंदेनी स्वत  त्यांना मत न देण्याचे आवाहन केले आहे.सरांना आता कुणाचाही पाठिंबा नाही हे सिद्ध झाले आहे.

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर हे त्यांच्या पदाधिकार्‍यासोबत सुरवातीपासूनच आ.भारत भालके सोबत मनापासून प्रचार करत आहेत. आघाडीचा धर्म पाळण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. पक्ष अडचणीच्या काळात पक्षाशी कोणतीही गद्दारी न प्रामाणिक पणे आपली जबाबदारी पार पडत आहेत.

कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ट मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी  हे शिस्त पाळणारे असतात.  पक्ष श्रेष्ठींचा निर्णय हा अंतिम मानणारे असतात.

सुशीलकुमार शिंदेनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रेमी आणि पक्षाशी एकनिष्ट मतदार हे "एकला चलोरो " म्हणत बंडखोरी करणार्‍या काळुंगे सरांना नाकारून आ. भारत भालकेंच्या घड्याळला मत देणार असेच चित्र दिसते आहे.
    
test banner