जवाहरलाल प्रशालेत मतदान जनजागृतीनिमित्त निबंध व रांगोळी स्पर्धा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

जवाहरलाल प्रशालेत मतदान जनजागृतीनिमित्त निबंध व रांगोळी स्पर्धा       मंगळवेढा:    जवाहरलाल प्रशालेमध्ये  मतदान जनजागृतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   यामध्ये मतदान करण्याविषयी प्रतिज्ञातंबाखू विरोधी शपथनिबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मतदान प्रतिज्ञेचे वाचन  हरी कोंडूभैरी यांनी केलेतर  स्वच्छता व तंबाखूविरोधी शपथ मिलिंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याकडून घेतली.  सुंदर रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संदेश दिला. रांगोळी स्पर्धेसाठी शैलजा माने यांनी मार्गदर्शन केले. रांगोळी स्पर्धेत धनश्री आप्पासाहेब खुळे हिने प्रथम, ऋषिकेश शशिकांत चव्हाण याने द्वितीय तर  पुनम संतोष दवले हिने तृतीय क्रमांक पटकावला.   कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक  शंकर आवताडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर अवघडे ,संभाजी सलगरसंतोष दुधाळनितीन मोरेशिवकुमार स्वामीशहाजी ढोबळेसुनंदा काशीद,  सुनंदा देशमाने आदींनी परिश्रम घेतले. 

test banner