मंगळवेढा येथे शिवप्रेमींनी कडून सरकारचा निषेध. - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा येथे शिवप्रेमींनी कडून सरकारचा निषेध. महाराष्ट्राची अस्मिता असलेले गड-किल्ले सरकारने भाडेतत्त्वावर देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सध्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे शिवप्रेमींच्या भावना तीव्र असून मंगळवेढा येथे शिवप्रेमींनी तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारच्या या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
 शिवछत्रपतींचे गड-किल्ले ही आंतरराष्ट्रीय स्मारके असून  मराठेशाहीच्या धगधगत्या इतिहासाचा तो जिवंत पुरावा आहे ही स्मारके लग्नसमारंभासाठी व हॉटेलसाठी देऊन  शिवछत्रपतींचा इतिहास पुसण्याचा घाट सरकारने घातला आहे शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले हे सरकार आज शिवछत्रपतींची स्मारके भाड्याने देऊन  शिवप्रेमींच्या भावनेशी खेळत आहे यामुळे महाराष्ट्रातील तमामशिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून  हे गड किल्ले सांभाळलेले आहेत देशभरातून हजारो शिवप्रेमी याच गड-किल्ल्यांवरती जाऊन शिवप्रेमींच्या ज्वलंत  पराक्रमाची आठवण करून प्रेरणा घेत असतात गड किल्ले हे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत त्यामुळे सरकारने घेतलेला हा तुघलकी निर्णय शिवप्रेमींची माफी मागून त्वरित मागे घ्यावा  अन्यथा उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वस्वी सरकार जबाबदार असेल अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
 यावेळी संभाजी ब्रिगेडचे ता अध्यक्ष समाधान क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदार संघ अध्यक्ष अॅड. राहुल घुले ,नगरसेवक प्रवीण खवतोडे, नगरसेवक राहुल सावंजी, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष संदीप घुले, शिवाजी वाकडे, प्रकाश मुळीक, बबलू सुतार, रमिजराजा मुल्ला ,अभिजीत शिंदे, हर्षल डोरले,विनायक दत्तू,चंद्रकांत काकडे, कुंडलिक गणपाटील,अर्जुन डोरले,स्वप्नील फुगारे,नागेश भगरे, रविराज जाधव,शुभम इंगळे,मोहन मुदगूल,पोपट मोरे, उदयसिंह इंगळे यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा