जनता माझ्यासोबत हॅट्रीक पूर्ण करणार : आ भारत भालके प्रचंड मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

जनता माझ्यासोबत हॅट्रीक पूर्ण करणार : आ भारत भालके प्रचंड मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन



मंगळवेढा ( प्रतिनिधी ) दहा वर्षाच्या काळात कामे करत असताना काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जाणार असून अनेकांना आज मी कोणत्या पक्षातून लढणार याबाबत उत्सुकता असली तरी इतक्या लवकर मी माझा पक्ष सांगणार नसून जनता माझ्यासोबत असल्याने मी हटरिक करणार  असे प्रतिपादन आ. भारत भालके यांनी विधानसभा निवडणुकीच्या विचारविनिमय कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले ते बुधवारी मंगळवेढा येथील पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील एमआयडीसीच्या मैदानात कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते

यावेळी व्यासपीठावर रामचंद्र वाकडे,लक्षमण पवार,मोहन कोळेकर , तानाजी खरात, धनंजय खवतोडे,कैलास कोळी,किसन सावंजी, नाथा ऐवळे,मुरलीधर दत्तू,ज्ञानेश्वर भगरे,शंकर माळी,शंकर माळी,बाबा कोंडुभरी,पांडुरंग भाकरे,नितीन पाटील, नितीन नकाते,, दयानंद सोनगे, बाबासो पाटील, इश्वेर गडदे, रामचंद्र मळगे,शशिकांत बुगडे, सुरेश कांबळे,काका गायकवाड, तानाजी काकडे, इराप्पा पुजारी, यशवंत खताळ,सुर्यकांत बागल, सुनिल डोबे, अर्जुन चव्हाण,नागेश गंगेकर, यांच्यासह मंगळवेढा पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ भारत भालके यांनी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मंगळवेढा तालुक्यातील चाळीस वर्षापासून डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकणाऱ्या महिलांसाठी 40 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून कार्यान्वित केली 35 गावांच्या उपसासिंचन योजनेबाबत ेतकर्‍यांच्या शेतात पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे सांगितले.विकास करत असताना सुडाचे राजकारण केले नाही.कुणाला लुबाडले नाही कुणाकडून वर्गणी घेतली नाही.जात पात गट तट न पाहता लोकांची कामे केली. त्याबरोबर बसवेश्वर व चोखामेळा स्मारकासाठी जोरात प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.पंढरपुरातील एमआयडीसीच्या कामाबाबत मी केलेले प्रयत्न कोणत्याही सुज्ञ नागरिकाला पाहता येतील मात्र या कामाला कोणी आणि कसा विरोध केला हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर करणार असून अनेक विकासाच्या कामाबाबत अडवणूका झालेल्या आहेत. मात्र दहा वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही विरोध केलेल्या व्यक्तीला त्रास देण्याची भूमिका घेतली नाही. काही वर्तमानपत्रांनी माझ्या भूमिकेबाबत टीकाटिप्पणी केली वेटिंगवर आहेत हात जोडले नापास झाले मात्र समोरच्या माणसाने हात जोडल्यानंतर आपणही हात जोडणे हा संस्कारांचा  भाग आहे जनता माझी परीक्षक आहे माझे पास नापास ते ठरवतील. असे सांगत वेटिंगवर आणि रांगेत उभे राहून कोण मुलाखतीला गेले असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. मी जो निर्णय घेईल त्या निर्णयास आपला पाठिंबा आहे का असे त्यांनी उपस्थित मेळाव्यातील कार्यकर्त्यांना संबोधून हात वर करण्याचे आवाहन केले असता मेळाव्यातील सभामंडपातून सर्वांनी हात उंचावून तुम्ही जो निर्णय घ्याल त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे अशाप्रकारे समर्थन केले यावरून आमदार भारत भालके हे अद्यापही कोणत्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढवणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत त्यांनी भाषणादरम्यान मी कसलेला पैलवान असून माझे डाव इतक्यात टाकणार नाही असे सांगत राजकीय भूमिका सस्पेन्स ठेवण्यात धन्यता मानली. सोशल मीडियाचा वापर करून माझ्या बदनामीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत मात्र सूर्य उगवला शिवाय राहत नाही असे सांगत खोटे प्रचार करून जनतेचा पाठिंबा  मिळवता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या मेळाव्याप्रसंगी
 संजय कट्टे सर , मेजर  रमेश शिंदे,  शहाजान पटेल , यशवंत खताळ, सुरेश कोळेकर,मनोहर कवचाळे सर, मनोहर कलुबर्मे, चंद्रकांत घुले, सुधीर धुमाळ, राहूल साबळे, महमद उस्ताद, संदीप मांडवे, विजयसिंह देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात पांडुरंग चौगुले यांनी भालके यांनी गेल्या दहा वर्षात तालुक्यातील पूर्ण केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली
सूत्रसंचालन भारत मुढे व इंद्रजित घुले यांनी केले तर आभार मारूती वाकडे यानी मानले.


सत्ता नसताना कामे मार्गी लागण्यात अडचणी

मंगळवेढा तालुक्यातील काही कामे अपूर्ण आहेत या कामाबाबत मी पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहे मात्र कामाबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याने कामे मार्गी लागण्यात अडचणी आल्या आहेत सत्ता नसताना कामे मार्गी लागण्यात अडचणी येतात असे सांगीतले.


11 सप्टेंबर रोजी आमदार भालके  यांचा मेळावा असल्याने दोन्ही तालुक्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते मंडपात पंचवीस हजार लोक बसू शकतील इतक्या  खात्रीने भव्य मंडप उभारण्यात आला होता प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळी मंडपाबाहेर सुद्धा हजारो लोक भारत भालके यांच्या निर्णयाकडे लक्ष लावून उभे होते मात्र मेळाव्याला आलेल्या लोकांकडूनच तुम्ही मी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देणार का? असे विचारून भालके यांनी मेळाव्यात आलेल्या प्रत्येकाने तीन मते मिळवली तर माझी  विधानसभा पार पडते असे सांगितले.
test banner