आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन.. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन..


मंगळवेढा (प्रतींनिधी)-सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांतराव परिचारक संयोजन समिती मंगळवेढा यांच्या वतीने दि.23/08/2019 रोजी शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे प्रथमच भव्य व खुल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, कबड्डी खेळाडूंनी व कबड्डी चाहत्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  
ग्रामीण भागात प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून या खेळाची माहिती व प्रसार व्हावा या उद्देशाने सदर च्या प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा या दामाजीपंतांच्या भूमीमधून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमविलेले आहे. मात्र, प्रो-कबड्डी या खेळासही भरपूर वाव असल्याने या खेळाची माहिती,नियम,व खेळ या भागातील खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना माहिती व्हावा व या खेळाचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रेमी चौक आठवडा बाजार,मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक २३/०८/२०१९ रोजी सकाळी ठिक १० वाजता भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
     या स्पर्धेचे उद्घाटनसोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी ना.विजयकुमार देशमुख (मालक) यांच्या हस्ते व माजी पालकमंञी प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेसदर च्या स्पर्धे करीता प्रमुख उपस्थिती युटोपीयन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक व जिल्हा परीषद सदस्य वसंतनाना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार  आहे.
     या स्पर्धेकरीता पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
क्रमांक       बक्षीस स्वरूप                             तर्फे
प्रथम       रुपये २१,,११/- व सन्मानचिन्ह   मा.शिवानंद पाटील माजी सभापती शिक्ष आरोग्य जिल्हा परिषद, सोलापूर
द्वितीय     रुपये ११,,११/- व सन्मानचिन्ह   मा.संतोष कोंडूभैरी, श्री समर्थ डेअरी, मंगळवेढा.
तृतीय      रुपये ७,,११/- व सन्मानचिन्ह    मा.डॉ.शरद शिर्के,शिर्के मॅटर्निटी होम, मंगळवेढा
चतुर्थ      रुपये ५,,११/- व सन्मानचिन्ह    मा. राहुल ताड, युवक नेते, मंगळवेढा 

या स्पर्धा मॅट वरती खेळविण्यात येणार असून स्पर्धे करीता प्रवेश फी रुपये ५००/- इतकी नाममात्र ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धे करीता नावनोंदणी गुरुवार दिनांक २२/८/२०१९  रोजी सायं.६ वाजेपर्यंत करावयाची आहे. सदर च्या स्पर्धा या फक्त पुरुष वर्गासाठीच ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी सदर च्या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांतरावजी परिचारक संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहिती करीता खालील क्रमांकावरती संपर्क साधावा ही विनंती.

रामभाऊ दत्तु सर ८२०८८९८३७७,नंदकुमार गवळी   ९७६३५५०४२९,

सुभाष मस्के सर ९८२२५२६८६९,                               गजेंद्र पवार सर     ९४२०६६२११९   
नागनाथ क्षीरसागर गुरुजी ९४२३४४८०७०,                        अविनाश कदम सर   ८८०६१४१४१२ 
test banner