मंगळवेढ्याच्या कोरडवाहू ४५ गावांच्या आंदोलनाला पहिले मोठे यश.... - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्याच्या कोरडवाहू ४५ गावांच्या आंदोलनाला पहिले मोठे यश....


कोरडवाहू गावांसाठी ठिबकला ८०% अनुदानाचा राज्य शासनाचा निर्णय

मंगळवेढा(महादेव धोत्रे)-राज्य शासनाने कोरडवाहू गावांना ठिबकसाठी ८०% अनुदान देण्याचा नुकताच निर्णय घेतला. हे मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसावर अवलंबून असनाऱ्या कोरडवाहू दुष्काळी ४५ गावांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेले पहिले यश असल्याचे मत सदर लढ्याचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
     एक वर्षापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असनाऱ्या कोराडवाहू ४५ गावांनी कायम  दुष्काळी गावांना ठिबकसाठी ९०% अनुदान द्यावे, पावसावर अवलंबून गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा देऊन कोरडवाहू शेती विकास महामंडळ स्थापन करावे, आदिवासी भागांसारख्या योजना या कोरडवाहू गावांना देऊन विकास करावा यासह अनेक मागण्यासाठी ४५गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बैलगाडीसह जनावरे व महिलासह मंगळवेढ्यातील सर्वच रस्त्यावर  रास्तारोको मोठे आंदोलन केले, धरणे आंदोलन सह अनेक तीव्र आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सर्वच वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी सदर आंदोलनाची मोठी दखला घेऊन आंदोलनाला प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे कोरडवाहू गावांचा प्रश्न शासनापर्यंत पोहचला. आ,भारत भालके यांनी विधानसभेत या विषयावर चर्चा ही घडवून आणली. सदर आंदोलनाची दखाल घेऊन शासनाने कोरडवाहू गावांना ठिबकसाठी ८०% अनुदान जाहिर केले आहे, यानिर्णयाबाबत ४५ गावातील लोकांनी आनंद व्यक्त केला असून याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी संघर्ष समितीचे सदस्य बाळासाहेब लेंडवे व बापूसाहेब मेटकरी यांनी व्यक्त केली.
        निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असनाऱ्या गावांचे दुःख मोठे आहे. व त्याला वाचा फोडण्यासाठी मंगळवेढ्याच्या कायम दुष्काळी गावातील शेतकरी,महिलांनी मोठा सहभाग घेऊन सिंचनाखालील गावे व निव्वळ पावसावर अवलंबून असनारी गावे यांना वेगवेगळा न्याय देवून दुष्काळी गावावरील अन्याय दूर करण्यासाठीच आंदोलन उभे राहिले होते असे मत आंदोलन समितीचे सदस्य तथा प. स. सभापती प्रदिप खांडेकर व गुरलिंग दोलतडे यांनी सांगितले.
     मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या दिल्लीतील केंद्रीय पथकापुढेही कोरडवाहू गावांचा प्रश्न आंदोलन कर्त्यांनी प्रभावीपणे मांडून कायम दुष्काळी गावांच्या प्रश्नाकडे केंद्रीय पथकाचे लक्षवेधले. मुख्यमंत्री, महसुलमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनीधी यांना भेटून या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देण्याची विनंती केली होती असे संघर्ष समितीचे सदस्य तानाजी जाधव व शिवाजी चव्हाण यांनी सांगितले.

चौकट- आमची कोरडवाहू गावांची ठिबकसाठी ८०% आनुदान देण्याची एक मागणी शासनाने मान्या केली आहे त्याचा आनंद आहे, पण अजून कोरडवाहूगावांचा दर्जा मिळवणे, मागेल त्याला सामुहिक शेततळे मिळविणे व पांडुरंग फुंडकर फाळबाग योजना कोरडवाहू गावातील मागेल त्या शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी आम्ही अजून तीव्र आंदोलन करु.
  *- कृषिभूषण अंकुश पडवळे*
निमंत्रक, ४५ कोरडवाहू गांवे, मंगळवेढा
test banner