प्रहार संघटनेने केली मागणी
मंगळवेढा (प्रतिनिधी.)यावर्षी एकीकडे नदीला पूर आला तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत ही उजनी धरणातून जवळजवळ शंभर टीएमसी पाणी भीमा नदीच्या पात्रातून सोडण्यात आले.वाया जात असलेल्या पाण्याला योग्य दिशा द्यावी ते पाणी सर्व ग्रामीण भागातील शेततळे भरून द्यावीत.प्रशासनाने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन या मागण्या मान्य करून तळागाळापर्यंत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी तसेच सर्व प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे मागणी केली आहे..
यावर्षी एकीकडे नदीला पूर आला तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत ही उजनी धरणातून जवळजवळ शंभर टीएमसी पाणी भीमा नदीच्या पात्रातून सोडण्यात आले.वाया जात असलेल्या पाण्याला योग्य दिशा द्यावी ते पाणी सर्व ग्रामीण भागातील शेततळे भरून द्यावीत.प्रशासनाने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन या मागण्या मान्य करून तळागाळापर्यंत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी तसेच सर्व प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे मागणी केली आहे..
ह्या प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने या विषयाकडे लक्ष घालावे, यासाठी प्रहार संघटनेने या अगोदरही निवेदन दिले असून यावर ती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तसेचअधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे तसेच उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील जनता पाण्याअभावी वंचित आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यातील ३० ते ४० तलाव शेततळी, नाले, ओढे, गाव तलाव हे लवकरात लवकर भरून द्यावेत अन्यथा प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील, युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 'प्रहार'च्या अनोख्या पद्धतीने मोठ्या संख्येने हे आंदोलन छेडण्यात येईल. यासाठी आज उपविभाग अधिकारी व प्रांताधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले..