तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या आ .भारत भालके मुख्यमंत्र्याना केला पत्रव्यवहार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या आ .भारत भालके मुख्यमंत्र्याना केला पत्रव्यवहार


मंगळवेढा (प्रतिनिधी)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील गेल्यावर्षी मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपात तुर या पिकाचा विमा उतरवलेला होता मात्र चुकीच्या निकषा द्वारे त्यांना या भरपाई तून वगळण्यात आले असून संबंधित विमा कंपनी वगळण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमाभरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आ. भारत भालके यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
सन  2018 च्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामात 3040 हेक्टरवर सुमारे 4012 तूर उत्पादक शेतकऱ्यांना चुकीचे निकष लावून भरपाईतून वगळले आहे. आता या या हंगामातील तुर पिकांच्या विम्याचे भरपाई वाटप सुरू करण्यात आले असून माझ्या मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यात असलेले तूर उत्पादक शेतकरी या निकषात पात्र आहेत मात्र विमा कंपनीने यातील काही शेतकऱ्यांना भरपाई रक्कम दिली आहे. तर काही शेतकऱ्यांना चुकीचे निकष लावून यातून वगळण्यात आले आहे त्याच भागातील शेतकऱ्यांना बाजरी व सूर्यफुलाची भरपाई मिळाली मात्र तुरीची भरपाई देण्यात आलेली नाही या भागातील शेतकरी संबंधित कंपनीकडे तक्रार करण्यास गेल्यानंतर ती तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असून ही बाब अतिशय गंभीर आहे या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगामात विमा हप्ता भरलेल्या सर्वदूर उत्पादक शेतकर्‍यांना भरपाईची रक्कम तात्काळ देण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. भारत भालके यांनी केली आहे.
test banner