मुंबई – सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येण्याची शक्यता असून राज ठाकरे यांना येत्या काही दिवसांत ईडीकडून समन्स बजावण्यात येईल, अशा आशयाचे वृत्त ‘फ्री प्रेस’ने दिले असल्यामुळे राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत येणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
ईडीच्या रडारावर गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते आहेत. अशातच या यादीत राज ठाकरे यांचेही नाव आल्यामुळे विधानसभा निवडणूक या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा ‘कोहिनूर मिल 3 विकत घेण्यामध्ये सहभाग असून याच कारणाने ते ईडीच्या निशाण्यावर असल्याचे फ्री प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.