मंगळवेढा:-
येथील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सप्तशृंगी मंडळाने नवरात्र महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे व पावनखिंड ऐतिहासिक देखाव्याचे आयोजन केले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे यांनी सांगितले.
रविवार दि ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मारुती नाना जगदाळे यांच्या हस्ते घटस्थापना होणार असुन सोमवार दि १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करुणा मतिमंद व मूकबधिर मुलांची शाळा,मंगळवेढा येथे फळे वाटप करण्यात येणार आहे तर सायंकाळी ५ वाजता नरवीर बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांच्या असामान्य त्यागाला आणि पराक्रमाला मुजरा करणारा ऐतिहासिक पावनखिंड देखाव्याचे उदघाटन संपन्न होणार आहे.
गुरुवार दि १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सद्यस्थितील दुष्काळी परिस्थिती पाहून दामाजी नगर येथील स्वामी समर्थ गोशाळेतील जनावरांना चारा वाटप करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सप्तशृंगी देवी मंदिर येथे नवजीवन हॉस्पिटल,मंगळवेढा यांच्या सौजन्यातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नवरंगे बालकाश्रम,पंढरपूर येथील अनाथ मुलांना धन्यदान करण्यात येणार असुन रविवार दि १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सप्तशृंगी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विजयादशमीदिनी भव्य मिरवणुक निघणार आहे धार्मिक उत्सवाबरोबरच मंडळाने आरोग्य,धान्यदान,रक्तदान, पशुधनासाठी चारा आणि मतीमंद मुलांना फळे असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.
दुष्काळीस्थिती डोळ्यापुढे ठेवून मंडळाने राबविलेल्या सर्वच सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सदर महोत्सव पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे यांचेसह रणजित चेळेकर,कृष्णा ओमणे,रियाज शेख,रोहित जठार,अक्षय वांगीकर,अजित गांडुळे,ऋतुराज भगत,ओम खटकळे,रामेश्वर पवार,संजय जावळे,सुधीर सावंजी,विजय काळुंगे राहुल जठार,गणेश गांडुळे,दादा गायगोपाळ,सीताराम ढगे आदी परीश्रम घेत आहेत.
