ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा रद्द न झाल्यास 3 ऑक्टोबर पासून मंगळवेढा बेमुदत बंदचा इशारा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा रद्द न झाल्यास 3 ऑक्टोबर पासून मंगळवेढा बेमुदत बंदचा इशारा.


मंगळवेढा :- 

मंगळवेढा येथील अनिता काळुंगे व दारासिंग रजपूत यांच्यावर झालेला ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा रद्द करावा तसेच नगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्याला हाताशी धरून नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांवर करण्यात येत असलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि खोटा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अन्यथा 3 ऑक्टोबर पासून मंगळवेढा बेमुदत बंदचा इशारा मंगळवेढ्यातील सर्व जातीच्या समाज बांधवांनी दिला आहे.


सदर मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना देण्यात आले ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली असून,या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निपक्ष व पारदर्शक चौकशी करावी,अशी मागणी समस्त मंगळवेढेकर नागरिकांकडून करण्यात आली आहे तसेच,जाणीवपूर्वक दमदाटी करून ॲट्रॉसिटीची धमकी देणे अशा प्रकारामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


 कायद्याचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवरही कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातून हजारो बांधव उपस्थित होते.

test banner