मंगळवेढा:-
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय बसवणा बागेवाडी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय श्री बसवेश्वर जयंती उत्सवातील परिषदेत घेण्यात आला.
बसवणा बागेवाडी विकास प्राधिकरणाच्या सिद्धलिंग महाराज वतीने मंगळवेढा येथील बसवेश्वरांच्या कर्मभूमीला ‘धर्मस्थळ’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली.
मंगळवेढा जिल्हा सोलापूर ही बसवेश्वरांनी सुमारे 13 वर्षे वास्तव केलेली भूमी असून,त्यांच्या ‘कायकावे कैलास’ आणि समतेच्या विचारांची प्रभावी मांडणी याच ठिकाणी झाली.त्यामुळे या भूमीला धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी बसवेश्वरांच्या विचारांशी संबंधित बसवण्णा बागेवाडी,बसवकल्याण आणि कुडलसंगम या तीन धर्मस्थळांना मान्यता होती.आता मंगळवेढ्याचाही त्यात समावेश झाल्याने अनुयायांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंगळवेढा यास धर्मस्थळाचा दर्जा द्यावा, यासाठी बसवणा बागेवाडी विकास प्राधिकरणा सिद्धलिंग महाराज कर्नाटक सरकारकडे यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले.या वेळी मल्लय्या स्वामी,रेवणसिद्ध लिगाडे,सतीश दत्तू,प्रफुल्ल सोमदळे,अजय आदाटे,मनोज माळी,महादेव सारवाड,सागर पाटील,धनाजी घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच, मंगळवेढा येथे लवकरच बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या निर्णयामुळे मंगळवेढा धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता असून, भाविकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. परिसराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, सुशोभीकरण आणि भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक स्तरावर होणार असून, मंगळवेढ्याच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक ओळखीला नवी उंची मिळणार आहे.
