प्रतिनिधी:-
वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच मंगळवेढा पोलीस स्टेशन व शिवश्री प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या सप्रेम सहकार्याने आज बुधवार दि 31 डिसेंबर 2025 रोजी दामाजी चौकात सांयकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत दारू नको दूध प्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आज समाजामधील वाढती दारूची वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता नववर्षाच्या स्वागतासाठी वारी परिवाराने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत तसेच तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जात आहे दारूच्या नशेत गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात होतात परिणामी संपूर्ण कुंटूबाची आर्थिक स्थिती खालावते व त्यातून समाजाची फार हानी होते यासाठी व्यसनामुक्तीचा संदेश देण्यासाठी दारू नको दूध प्या या उपक्रमातून मोफत मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी दुधाचे फायदे व दारूचे तोटे सांगणारे पत्रके वाटप करण्यात येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
