मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वारी परिवाराने रस्त्यावर,झोपडीमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या गरजुंना ब्लॅंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली सद्या थंडीचा जोर वाढत असताना वारी परिवाराने मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सामाजिक जाणीवेतून रस्त्यालगत,मंदिराशेजारी,निराधार,झोपडपट्टी व गरजुंना ब्लँकेट वाटप करण्यातआले.
या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आला असून “सेवाच खरा धर्म” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला ब्लॅंकेट मिळाल्यावर थंडीमुळे त्रस्त असलेल्या अनेक गरजू नागरिकांच्या व मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून वारी परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
सदर उपक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी सिद्धेश्वर शिंदे,उमेश माने,प्रफुल्ल सोमदळे,दत्तात्रय भोसले,सुनिल लेंडवे,आदेश मोरे,किरण मोरे, विठ्ठल बिले,रतिलाल दत्तू,गणेश मोरे,पार्थ भगरे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू उपस्थित होते.
