प्रतिनिधी:
मंगळवेढा : शिक्षक हा महात्मा गांधीजींच्या विचारांचा शेवटचा प्रामाणिक घटक असून शासनाचा विश्वास शिक्षकांवर जास्त असल्यानेच शिक्षकांना जादा कामकाज दिले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
जिजामता प्राथमिक शाळेच्या सभागृहात लोकमंगल बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित उल्लेखनिय कामकाज केलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या कार्यमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते. याप्रसंगी बोलताना ढोवळे सर म्हणाले की, आदर्श शिक्षक हा नेहमीच उपक्रमशील असावा. त्याने विद्याार्थ्याना नेहमीच नवीन विचार द्यावेत. परंतु सरकानेही शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम द्यावे ,इतर अशैक्षणिक कामं बंद करावीत. जागतीक दर्जाचा माणूस घडविण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांतच आहे. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून संरकारची शिदोरी देणारा आहे. त्याचे अध्यापन केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून जीवनमूल्य, कुटुंवाची जाणीव ,समाजभान व मानवता ,शिक्षण यातून प्रतिबिंबीत होत असते .अशा कृतीशिल शिक्षकांचा गौरव लोकमंगल बँकेने करून शिक्षकांना कौतुकाची थाप टाकली हे कौतुकास्पद आहे.
यावेळी सुप्रसिद्ध शिव व्याख्याते मा .प्रशांत सरूडकर सर यांनी आदर्श शिक्षक व ज्ञानपरंपरा या विषयी शिक्षकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सरूडकर यांच्या व्याख्यानाला उपस्थितांनी टाळयाच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मिनाक्षीताई कदम होत्या. या प्रसंगी बोलताना सौ . कदम म्हणाल्या की, शिक्षक हा कलावंत असून देशाची, सुसंस्कृत पिढी घडविण्याचे पुण्य काम शिक्षकांवर आहे.
या प्रसंगी मंगळवेढा कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती मा . सोमनाथ आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांचे व गुणवत्तेचे कौतुक केले ..पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता भिंगे व कवीराज दत्तू यांनी आपले मानेगत व्यक्त केले. शिक्षक नेते व लोकमंगल बँकेचे मार्गदर्शक संजय चेळेकर यांनी लोकमंगल परिवाराचे मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक बँकेच्या प्रधान कार्यालयातील कायदा विभाचे प्रमुख अँड शिवाजी दरेकर यांनी केले. यावेळी बँकेच्या प्रगतीचा अहवाल सादर करून बँकेच्या विविध कर्ज योजना, पर्यटन सप्ताह आदी माहीती उपस्थितांना दिली. कार्यकमचे सुत्रसंचालन वालाजी शिंदे सर यांनी केले.
याप्रसंगी उल्लेखनिक कार्य करणा-या हरिबा लोखंडे, कवीराज दत्तू ,लक्ष्मण सुरवसे ,दत्तात्रय माळी राधेशाम कांबळे लक्ष्मण पाटील, शिवाजी भुसनर ,लक्ष्मण लिगाडे , संतोष इंगळे ,विशाल जाधव, नामदेव कळसे ,संतोष पवार, रूक्मिणी शेटे ,अनिता भिंगे, भाग्यश्री काळुंगे, डॉ. धनश्री कापशीकर या १६ शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ . उज्वलाताई चेळेकर ,आवताडे शुगरचे चेअरमन मा . संजय आवताडे, डॉ. सुभाष कदम , संभाजी तानगावडे सर, बँकेचे शाखाधिकारी सचिन पलंगे तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वावचे ,रमेश दत्तु ,अक्षय भोसले ,विशाल शिंदे ,सोमनाथ गायकवाड ,आदित्य सोळगे ,उमेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.