मंगळवेढा :-
सजग नागरिक संघ, मंगळवेढा व ॲग्रीक्रॉस एक्सपोर्ट प्रा.लि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा तालुक्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे गुरूंचा महागौरव सोहळा संपन्न होणार आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक महागौरव सोहळा २०२५ हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉक्टर संजय कळमकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे सदस्य लोकप्रिय आमदार समाधान आवताडे,माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,स्व.भारत नाना भालके फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. प्रणिती भालके,धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभा शिवाजीराव काळुंगे,सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा शिक्षण अधिकारी ज्ञानदेव जावीर,प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब झांबरे पाटील व रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा चे माजी चेअरमन साहेबराव पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात उपस्थित सर्व गुरुजनांचा "मी सावित्री" पुस्तक,गुलाब पुष्प देऊन आदरपूर्वक गौरव करण्यात येणार आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० शिक्षकांचा सजग शिक्षक पुरस्कार आणि निवृत्त शिक्षकांना सजग जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल तसेच मंगळवेढा तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा विशेष सन्मान होणार आहे तसेच मंगळवेढा सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे शेतकरी आणि मार्गदर्शक यांना सजग ॲग्रीकॉस पुरस्कार देऊन शेतकऱ्यांमध्ये शिक्षक म्हणून मार्गदर्शन करणारे कृषी मार्गदर्शकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक आपले शिक्षक मित्र "डॉ. संजय कळमकर" यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले, तसेच मंगळवेढातील पिकपद्धती मध्ये बदल करून आर्थिक समृद्धता आणण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सहप्रयोजक म्हणून नेक्सा स्पेशालिटी फर्टीलायझर, नाशिक आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुलर डेव्हलपमेंट सोसायटी, मंगळवेढा यांचे सहकार्य लाभले आहे.
तरी या गुरुजन महागौरव सोहळ्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आपला बहुमूल्य वेळ देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सजक नागरिक संघ,मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.