आज शंभु महादेवाच्या रांजणीत डाळींब तेल्या विषयावर चर्चासत्र. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १७ जून, २०२५

आज शंभु महादेवाच्या रांजणीत डाळींब तेल्या विषयावर चर्चासत्र.


पंढरपूर : 

रांजणी ( ता . पंढरपूर ) येथे आज बुधवार (ता . १८ ) रोजी सायंकाळी सहा वाजता डाळिंब पिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे . ग्रामदैवत श्री महादेवाच्या भव्य अशा सभामंडपात हा कार्यक्रम सपन्न होणार आहे . त्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे , असे अवाहन ॲग्रीकॉस कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे . 



सध्या वातावरणात अचानक बदल झाला आहे . ऐन उन्हाळ्यातच पावसाळा शेतकरी अनुभवत आहेत . वातावरणातील आर्द्रता व तापमान सतत वाढत आहे . त्यामुळे डाळिंबाच्या बागेवर तेल्या (बॅक्टेरियल ब्लाईट ) हा जिवाणूजन्य रोगाचे प्रमाण वाढले आहे . फळावर असलेल्या डाळिंब बागा या रोगाला बळी पडत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . तेल्या रोगाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर ॲग्रीकॉस कंपनीच्या वतीने डाळिंब पिकावर चर्चा सत्राचे आयोजन केले आहे . यामध्ये तेल्यावर कमी खर्चात कसे नियंत्रण करावे . काळे डाग हटवण्यासाठी काय उपाय करावेत . याबद्दल ॲग्रीकॉसचे टेक्नीकल    डायरेक्टर अजय आदाटे  मार्गदर्शन करणार आहेत.


या कार्यक्रमाला कट्टे उद्योग समुहाचे संजय कट्टे , ॲग्रीकॉसचे डायरेक्टर शहाजी घाडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमात डाळिंब पिकातून भरघोस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे . त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या चर्चासत्रात आपला सहभाग नोंदवावा . या चर्चासत्रात भाग घेणे म्हणजेच आपली बाग तेल्यामुक्त राहण्यास मदत होणार आहे.


अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी 8087788136 या नंबर वर संपर्क करावा.


test banner