पंढरपूर सायकल वारी व संमेलनासाठी वारी परिवार सायकल क्लबचे 22 जूनला प्रस्थान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १८ जून, २०२५

पंढरपूर सायकल वारी व संमेलनासाठी वारी परिवार सायकल क्लबचे 22 जूनला प्रस्थान.


मंगळवेढा:-

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर देव भूमीत रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी होणाऱ्या चौथ्या सायकल वारी व संमेलनासाठी वारी परिवार सायकल क्लब 22 जून रोजी पहाटे 4.30 वाजता प्रस्थान करणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे यांनी सांगितले.


आरोग्य,पर्यावरण व अध्यात्म या त्रिवेणी संगमातून होणारी सायकल वारी सायकल संस्कृतीचे प्रेरणास्थान ठरणार आहे.सदर वारीत नगर प्रदक्षिणा घालून रेल्वे मैदानावर रिंगण सोहळा व राज्यस्तरीय सायकल संमेलन होणार आहे.


यावेळी महाराष्ट्रातून तब्बल तीन हजार सायकल पट्टू वारीत सहभागी होणार आहेत हरित वारी पालखी महामार्गावरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वारी परिवाराचे 25 सायकल स्वार सहभागी होणार आहेत.


test banner