मंगळवेढ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ५ मार्च, २०२५

मंगळवेढ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी.


मंगळवेढा:-

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापची लाट उसळली आहे.


बुधवारी सायंकाळी सहा वाजता दामाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देण्यात आली.


यावेळी ‘धन्या मुंडे व वाल्या कराडला फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.


सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे तीन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली होती.या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यासह काही जणांना अटक झाली आहे. 


संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाले आहेत.या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांचे अत्यंत वाईट पद्धतीने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 


त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मीक कराडच्या फाशीची मागणी होत असून मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे व दोघांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.


यावेळी मंगळवेढा शहर व तालुका सकल मराठा समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते.


test banner