लेकीच्या वाढदिवसानिमित्त बापानं आख्ख थिएटर केलं बुक सहकुटुंब,मित्र आणि बच्चे कंपनीला दाखवला 'छावा' - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

लेकीच्या वाढदिवसानिमित्त बापानं आख्ख थिएटर केलं बुक सहकुटुंब,मित्र आणि बच्चे कंपनीला दाखवला 'छावा'

प्रतिनिधी 




छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित छावा सिनेमाची सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चा होत असताना.छत्रपती चा इतिहास आणि हिंदवी स्वराज्य करिता दिलेले बलिदान काय असते याकरिता तरुण,महिला आणि आवर्जून लहान मुलांनी हा सिनेमा बघावा असा विचार मनात आणून एका शिवभक्त बापानं आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा मधील  अख्ख रंगप्रभा थिएटर बुक केलं आणि छावा सिनेमा दाखवला,मंगळवेढा मधील हा प्रसंग घडला आहे.


नेमकी घटना काय?

शिवजयंतीच औचित्य साधत मंगळवेढा मधील शिवभक्त शिवश्री प्रशांत घुले आणि मुलीचे चुलते शिवश्री चंद्रकांत घुले यांनी आपल्या *नवेली* या कन्येच्या ७व्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा मधील रंगप्रभा थिएटर एक शो अख्खा बुक केला.हा शो बघण्या करीता घुले गल्ली,रोहिदास गल्ली,खंडोबा गल्ली,दत्तू-गुंगे गल्ली,कुंभार गल्ली,राजे ग्रुप,मंगळवेढा टायगर आणि जगदंब परिवार मधील सदस्य उपस्थित होते.



बाप आणि चुलता यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे.छावा सिनेमात दाखवण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य व्हावे या करिता चा बलिदान देण्यापर्यंत चा संघर्ष लहान मुलांनाहि माहिती व्हावा.पुष्पा सारखा हिरो ला आपल्या जीवनाचा आदर्श मानण्या पेक्षा छत्रपती ना का आदर्श मानावा हा हेतू मनात धरून साधलेला अनोखा उपक्रम.छत्रपती चा ऐतिहासिक इतिहास जो जय भवानी जय शिवाजी का म्हणण्यास भाग पाडतो आणि छत्रपती काय होते हे दाखवण्याचा हेतू आणि उद्देश जो त्यांनी चित्रपट दाखवून साध्य केला त्याबद्दल त्यांचं आलेल्या सर्व सदस्य कडून कौतुक केलं आणि नवेलीचा 7वा वाढदिवस थिएटर मध्ये बालगोपाळ आणि सर्व सहकुटुंबात केक कापून,फटाकेची अतिशबाजी करून साजरा करण्यात आला.

test banner