सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी दिली.


मंगळवार दि.11 फेब्रुवारी रोजी सायं 5 वाजता भगवी पदयात्रा,सायं 6 वाजता शिवमंचाचे पूजन,सायं 7 वाजता शिवमुर्तीची प्रतिष्ठापना तर सायं 7.30 वाजता शिवम योगा क्लासच्या विदयार्थ्यांकडून योगसाधनेतून शिववंदन करण्यात येणार आहे.


बुधवार दि.12 फेब्रुवारी रोजी सायं 7 वाजता संदीप मोहिते व आण्णा चव्हाण तिप्पेहळी ता.सांगोला यांचे जुगलबंदी भारूड गुरुवार दि.13 फेब्रुवारी रोजी 7 वाजता शिवरायांना का आठवावे ? या विषयावर निलेश चव्हाण,संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे.


शुक्रवार दि.14 फेब्रुवारी रोजी 7 वाजता युवाशाहीर अविष्कार देशिंगे कवठेमहाकांळ जि.सांगली यांचा स्फूतीगीते व पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून शनिवार दि.15 फेब्रुवारी रोजी 7 वाजता मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.रविवार दि 16 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर तसेच वेशभूषा स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर सायं 7 वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य ह.भ.प. पंकजपाल महाराज,वाशीम यांचे पंकजपाल की प्रबोधनवाणी यातून सप्तखंजीरी कीर्तन होणार आहे.


सोमवार दि.17 फेब्रुवारी रोजी 7 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असणारा अभिजित जाधव व आमु जाधव अंबेजोगाई जि.बीड यांचा लोककलेचा अविष्कार शिवशंभू गर्जना हा कार्यक्रम होणार आहे.


मंगळवार दि.18 फेब्रुवारी रोजी 7 वाजता महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांची ओळख करून देणारा मराठी गीतांचा महाराष्ट्राची ताल यात्रा,जयसिंगपूर हा कार्यक्रम होणार आहे.विशेष बाब म्हणजे सेलिब्रेटी म्हणून सुर नवा ध्यास नवा फेम ब्रम्हानंदा पाटणकर,मुंबई या उपस्थित राहणार आहेत.


बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिनी सकाळी 10 वाजता महिलांची भव्य भगवा फेटा रॅली तर दुपारी 3 वाजता मंगळवेढा शहरातून विविध वांद्यासहित शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


तरी सर्व नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


test banner