मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील ४९ वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.शिवालयात आयोजित केलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी प्रतीक पडवळे,अभिजित सावंजी,अतिश लांडे,अजित लेंडवे,गणेश चव्हाण तर कार्याध्यक्षपदी प्रताप सावंजी,शक्ती सरवळे,स्वप्नील फुगारे,शैलेश गोवे,दीपक कसगावडे,निखिल भंडारे,पोपट मोरे,जमीर इनामदार,कुलदीप इंगळे,विश्वजीत जाधव,सुरज चव्हाण सचिवपदी कुमार शिंदे,अजित नागणे,कुमार कोंडूभैरी,प्रतीक लेंडवे,सौरभ पाटील,वरद नागणे,शुभम दिवसे सहसचिवपदी संतोष चव्हाण,सोमनाथ कोळी,रोहित मुदगुल,सार्थक ओमणे,सौरभ उन्हाळे खजिनदारपदी प्रा शिवाजी नागणे,प्रशांत घुले सहखजिनदारपदी दत्ता घाडगे,आयाज शेख,सचिन साळुंखे स्टेजप्रमुखपदी सोनू नागणे,दिनेश वेदपाठक,प्रज्वल घाडगे,आदित्य भोजने वर्गणीप्रमुखपदी वैभव कोंडूभैरी,प्रविण जावळे,ऋषिकेश कोंडूभैरी,श्रीराम मोरे,बालाजी कोळी,संतोष रंदवे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये विशेष म्हणजे नवीन चेहऱ्यांना जबाबदारी देऊन संधी देण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सर्वांना बरोबर घेऊन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा ४९ वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नारायण गोवे,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी,संभाजी घुले अनिल मुदगुल,सतिश दत्तू,राहुल सावंजी,अविनाश गुंगे,अर्जुन दत्तू यांचेसह शिवभक्त उपस्थित होते बैठकिचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.