मंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

मंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा.


प्रतिनिधी:-

माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे आज 84 उत्कृष्ट विद्यार्थी,महिला,जेष्ठ नागरिक व पत्रकारांचा पुरस्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. 


खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील जवाहरलाल शेतकी हायस्कूल येथे आज सकाळी ठीक अकरा वाजता पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या उचित्य साधून 84 उत्कृष्ट विद्यार्थी, 84 विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, 84 जेष्ठ नागरिक व तसेच मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारांचा पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, भैरवनाथ शुगर उद्योग समूहचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे असणार आहेत. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे व तसेच राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. 


यावेळी मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकास्तरीय व तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 


याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व  पदाधिकारी यांनी केली आहे.


test banner