प्रतिनिधी
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची मिटिंग अध्यासी अधिकारी मा.सचिन जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत नूतन चेअरमन पदी मा.शिवाजीराव गणपाटील व व्हाईस चेअरमन पदी मा.रावजी कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नूतन चेअरमन व नूतन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मावळते चेअरमन विष्णू आसबे व मावळते व्हाईस चेअरमन धनाजी नागणे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अध्यासी अधिकारी मा. सचिन जाधव साहेब व लेखापरीक्षक मा.इंद्रजित चव्हाण साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाचे नेते मा.संजय चेळेकर यांनी दामाजी पतसंस्थेचा इतिहास सांगताना सभासदांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांची एक आदर्श पतसंस्था असल्याचे सांगितले.
सर्व संचालक मंडळ एक रुपयाही भत्ता न घेता सभासदांच्या हितासाठी कार्य करत आहे.
नुकतीच श्री संत दामाजी शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्या सभेमध्ये सभासद कर्ज मर्यादा सहा लाखावरून सात लाख करणे, लाभांश 12% देणे.तसेच इतर अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत पतसंस्था अग्रस्थानी आहे .
दामाजी पतसंस्था सभासद पाल्यांच्या गुणवत्तेसाठी पारितोषिक देणे व विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणारी एक आदर्श संस्था मानली जाते.विविध क्षेत्रातील आदर्श काम करणाऱ्या व यश संपादन केलेल्या विद्यार्थी,गुणी शिक्षकांचा व शाळांचा सन्मान करत आली आहे.
याप्रसंगी शिक्षक संघाचे सल्लागार कांताराम बाबर,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी तानगावडे,सरचिटणीस राजेंद्र केदार,कोषाध्यक्ष सखाराम सावंत, संचालक धनाजी जगदाळे,धर्मराज जाधव,गौतम दोडके,प्रदीप यादव, चंद्रकांत माने,शिवाजी नकाते,रामचंद्र दोलतडे,भिमाशंकर तोडकरी,अनिता भिंगे,सुनिता काकडे,शिवानंद कोळी, विलास जाधव,उपाध्यक्ष गोपाळ लेंडवे,परमेश्वर गायकवाड,औदुंबर कुंभार,राजाराम पाटील, गंगाराम चव्हाण,सिद्राया लोणी, महालिंगराया कोळी व तालुका सोसायटीचे संचालक काशिनाथ लिगाडे उपस्थित होते.
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्याकडून नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. आभार सचिव मोहन लेंडवे यांनी मानले .